Banner

Improving Efficiency and Delivery of Public Services

प्राथमिक माहिती

एएसए हा असा घटक आहे जो अधिकृतीकरणाचं आवेदन एक किंवा अनेक एयुएच्या वतीनं सीआयडिआर ला पाठवतो. अश्याप्रकारे ते मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. त्यांच्या सुरक्षित एयुएज् अधिकृतीकरण कनेक्शन्सद्वारे ही आवेदनं ते सीआयडिआरला पाठवतात. एएसएला सीआयडिआरकडून रिस्पॉन्स मिळतो आणि मग तोच पुन्हा एयुएला पाठवला जातो.

एएसए पात्रता

यासाठी एजन्सीकडे खालील पूर्तता आवश्यक आहेः

 • केंद्र/राज्य सरकारचे मंत्रालय/विभाग किंवा केंद्र/राज्य सरकारच्या मालकीचा व त्यांचे व्यवस्थापन असलेला उपक्रम किंवा
 • केंद्र/राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत स्थापित करण्यात आलेले प्राधिकरण किंवा
 • ना नफा कंपनी/राष्ट्रीय महत्वाच्या विशेष हेतू संघटना किंवा
 • भारतीय कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली कंपनी जी पुढील आवश्यकता पूर्ण करते:
  • आर्थिक क्षमता - मागील सलग तीन वर्षात किमान १०० करोड रुपयांची वार्षिक उलाढाल आणि
  • तांत्रिक क्षमताः
   • फायबर ऑप्टीक्स नेटवर्कचा वापर करणारी संपूर्ण भारतात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाईडर (टिएसपी)असावी आणि सगळ्या राज्यात किमान १०० एमपीएलएस पॉईंट्स ऑफ प्रेसेन्स (पीओपी) असावेत.
   • डेटा, व्हॉईस ट्रान्समिशनसाठी नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर (एनएसपी) असावी आणि तिचा टिएसपीसोबत १०० एमपीएलएस पीओपीज् चा करार झालेला असावा किंवा
   • टिएसपी/एनएसपीसोबत वर उल्लेखल्याप्रमाणे करारकृत सिस्टीम इंटिग्रेटर असावी.
  • केंद्रिय/राज्यसरकार/केंद्रिय किंवा राज्यसरकार पीएसयु याकडून एजन्सीचं गेल्या सलग ५ वर्षात काळ्या यादीत नाव नोंदलं गेलेलं नसावं.

एजन्सीनं करारनाम्याद्वारे, युआयडिएआयच्या एएसए मानांकनानुसार आपली मुलभूत रचनेचा आराखडा, संचलन, वापर आणि देखभाल यातील क्षमता प्रदर्शित करायला हवी आणि एएसएला अपेक्षित कृती करण्यासाठी आवश्यक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची उपलब्धता आपल्याकडे आहे याचाही दाखला द्यायला हवा.

एएसए उपयोजनेसाठी युआयडिएआयची संरचना अंतिम असेल.

एएसएची उदाहरणं:

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) सारखी एजन्सी जी सध्या देशभरात रिटेल पेमेंट सिस्टीमसाठी सर्वाधिक महत्वाची मानली जाते.

डिआयटी/एनआयसी ज्या केंद्रिय/राज्यसरकार मंत्रालयं/विभागांना कनेक्टिव्हीटी सोल्यूशन्स् पुरवतात.

टेलिकॉम कॅरिअर्स, डिपॉझिटरी बॉडीज इ. एजन्सीज ज्या संबंधित सेवा अनेक संस्थांना पुरवतात.

एएस पूर्ततेच्या पाय-या
 • ऑनलाईन आवेदन भरा

  जी कोणतीही एजन्सी एएसए बनण्यासाठी उत्सुक असेल त्यांनी ऑनलाईन आवेदन पाठवावं. एएसए होण्यासाठी युआयडिएआयनं ऑनलाईन आवेदन उपल्ब्ध करुन दिलेलं आहे.
 • स्वाक्षरी केलेला करारनाम योग्य त्या पूरक कागदपत्रांसह युआयडिएआयकडे पाठवा

  एएसएनं स्वाक्षरी केलेला करारनाम योग्य त्या पूरक कागदपत्रांसह युआयडिएआयकडे हार्डकॉपी पाठवायला हवी. आवश्यक त्या कागदपत्रांसह करारनामा प्राप्त झाल्यानंतर युआयडिएआय एजन्सीनं पाठवलेलं ऑनलाईन आवेदन ऍप्रूव्ह करेल.
 • सीआयडिआर सोबत लिज्ड लाईन कनेक्टीव्हीटी

  एएसएनं त्याच्या माहिती केंद्रापासून ते सीआयडिआरपर्यंत एक सुरक्षित लिज्ड लाईन कनेक्टीव्हीटि घ्यायला हवी. तसंच, एएसनं व्यावसायिक गरजांनुरुप बॅन्डविड्थ, रिडंडन्सी इ. ची निवड करावी.
 • प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांचा दाखला

  एएसए नं युआयडिएआय मानांकन आणि तपशिलानुरुप आवश्यक ती यंत्रणा, प्रक्रिया, मूलभूत रचना इ. निर्माण करायला ह्व्यात. ऑनलाईन आवेदनाद्वारे या घटकांचा दाखला युआयडिएआयकडून मिळवायला हवा.
 • युआयडिएआयकडून ऍप्रूव्हल

  एएसएचं आवेदन युआयडिएआयकडून तेंव्हाच ऍप्रूव्ह होईल जेंव्हा सगळ्या आवश्यकता, तपशिल इ. ची पूर्तता केली जाईल. प्रक्रियेदरम्यान एएसएनं युआयडिएआयशी एंगेज असावं आणि आवश्यक ते स्पष्टिकरण द्यावं.
 • एंड टू एंड टेस्टिंग

  युआयडिआयएकडून आलेल्या ऍप्रूव्हलमुळे सीआयडिआरशी असलेल्या कनेक्टिव्हिटीची एंड टू एंड टेस्टिंग एएसए करु शकतो. लाईव्ह होण्याआधी असं सुचविण्यात येत आहे की, एएसएनं एयुएसोबत काम करुन एयुए ते एएसए ते सीआयडिआर आणि रिव्हर्स रिस्पॉन्स संपर्क याच्या खात्रीसाठी एंड टू एंड टेस्ट घ्यावी. तसंच एएसएनं पुरेसं बॅन्ड्विड्थ आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्यासाठी लोड टेस्टींगही घ्यावी. आधार अधिकृतीकरणाशी संबंधित, इन्फॉर्मेशन सिस्टीम लेखापरिक्षकांनी लेखा परीक्षा घेतलेली, योग्य त्या अधिकृत यंत्रणेकडून मानांकीत अशी यंत्रणाही लाईव्ह होण्यआधी एएसएनं घ्यायला हवी.
 • गो-लाईव्ह

  युआयडिएआयची सगळी मानांकनं आणि तपशिल याबाबत सर्व पूर्तता झाल्याचं कन्फर्मेशन आल्यानंतर एएसए गो-लाईव्ह होऊ शकतो. युआयडिएआय हे सगळं ऑनलाईन करु इच्छितं. त्याचसोबत, एयुएशी एंगेज झाल्यानंतरच एएसए कोणतंही अधिकृतीकरण पॅकेट पाठवू शकतो.
 • एयुएसोबत एंगेज

  सहाय्य करीत असलेल्या एयुएसोबत एएसए अधिकृत करार करु शकतो. युआयडिएआय नं काही मार्गदर्शक तत्वं निर्मित केली आहेत ज्यांचा समावेश या करारात केला जाऊ शकतो. मात्र तरीही हा करार केवळ त्या एएसए आणि एयुए यांच्यादरम्यान सिमित असतो, युआयडिएआय त्यासंबंधी कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही. तसंच, आधार अधिकृतीकरणाखेरीज एएसएनं एयुएला जर इतर काही व्हॅल्य़ू ऍडेड सेवा पुरवली तर, युआयडिएआयचा त्यात कोणताही सहभाग नसेल.
एएसए च्या महत्वाच्या जबाबदा-या
 • संबंधित प्रक्रियांच्या (प्रोसेसेस्, तंत्रज्ञान, सुरक्षा इ,) युआयडिएआय तपशिलांची आणि मानांकित अधिकृतीकरणाची खात्री करुन घेणं.
 • अधिकृतीकरणासंबंधित सगळ्या व्यवहारांचा तपशिल ठेवणे.
 • युआयडिएआयकडून लेखापरिक्षण झालेल्या आधार अधिकृतीकरणाशी संबंधित प्रक्रिया आणि सिस्टीम्स प्राप्त करणं.
 • अधिकृतीकरणात पुरवलेली माहिती तपासणं आणि मग ती सीआयडिआर ला पाठवणं.
 • सीआयडिआरकडून प्राप्त अधिकृतीकरणातील व्यवहारांचा निकाल, ज्यानं विनंती केलेली असते त्या एयुएला पाठवणं.
 • युआयडिएआयला एएसएच्या एंगेजमेंट्/डिस्एंगेजमेंट् याविषयी माहिती देणं.
 • आधार माहिती, अधिकृतीकरण सेवा किंवा आधारसंबंधित डेटा किंवा सिस्टीम यांच्या कोणत्याही तडजोडीबाबत युआयडिएआयला माहिती देणं.
अनिवार्य सुरक्षा आवश्यकता
 • केवळ लिज्ड लाईनद्वारेच एएसए सीआयडिआरशी कनेक्ट होऊ शकतो.
 • मेटा डेटा आणि रिस्पॉन्सेस केवळ लेखापरिक्षणासाठीच लॉग्ड व्हावेत.
 • अधिकृतीकरण पॅकेट्चा भाग म्हणून येणारे एन्क्र्प्टेड पीआयडी ब्लॉक आणि परवाना किज् सिस्टीमधे कुठेही संग्रहीत करु नयेत.
 • एयुए आणि एएसए मधील नेटवर्क हे नेहमी सुरक्षित असावं.