"ऑफलाइन आधार XML कसे तयार करावे?

आधार ऑफलाइन ई-केवायसी तयार करण्याची प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे:

• https://myaadhaar.uidai.gov.in/offline-ekyc URL वर जा
• ‘आधार क्रमांक’ किंवा ‘व्हीआयडी’ प्रविष्ट करा आणि स्क्रीनवर नमूद केलेला ‘सुरक्षा कोड’ प्रविष्ट करा, त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. दिलेल्या आधार क्रमांकासाठी किंवा VID साठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. UIDAI च्या m-Aadhaar मोबाईल ऍप्लिकेशनवर OTP उपलब्ध असेल. मिळालेला OTP टाका. एक शेअर कोड प्रविष्ट करा जो झिप फाइलसाठी पासवर्ड असेल आणि 'डाउनलोड' बटणावर क्लिक करा
• डिजीटल स्वाक्षरी असलेली XML असलेली Zip फाईल त्या डिव्हाइसवर डाउनलोड केली जाईल ज्यामध्ये वर नमूद केलेले टप्पे पार पाडले गेले आहेत.

ऑफलाइन आधार XML देखील mAadhaar ॲपवरून डाउनलोड केले जाऊ शकते.