आधार प्रमाणीकरण
आधार प्रमाणीकरण म्हणजे काय?
आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार क्रमांक धारकाचा आधार क्रमांक व त्यासोबत त्याची जनसांख्यिकीय माहिती किंवा बायोमेट्रीक माहिती सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (सीआयडीआर) मध्ये सत्यापन करण्यासाठी सादर केली जाते व अशी रिपॉझिटरी तिची अचुकता सत्यापित करते किंवा आपल्या जवळील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यात उणीव काढते, ती केली जाणारी प्रक्रिया होय.
विहंगावलोकन/आढावा
आधार क्रमांक किंवा त्याचे प्रमाणीकरण, आधार क्रमांक धारकाच्या संदर्भामध्ये कोणत्याही नागरिकत्वाचा किंवा निवासाचा अधिकार किंवा पुरावा ठरू शकत नाही.
बऱ्याच विनंती करणाऱ्या संस्था (किंवा सेवा प्रदाता) यांना स्वतंत्र व्यक्तींकडून त्यांचे ओळखीचे पुरावे घेण्याची आवश्यकता असते, जेणेकरून त्यांना ग्राहक सेवा, सब्सिडी किंवा लाभ अशा व्यक्तींना देता येणे शक्य होईल. असे ओळखीचे पुरावे गोळा करताना या सेवा प्रदातांना स्वतंत्र व्यक्तींनी सादर केलेली ओळखीच्या माहितीची कागदपत्रे किंवा पुरावे यांच्या सत्यापन/वैधतेच्या अचूकतेबद्दल बऱ्याच अडचणी येत असतात.
आधार प्रमाणीकरणाचा उद्देश हा डिजिटल, ऑनलाइन ओळखीचा प्लॅटफॉर्म देणे आहे, जेणेकरून आधार क्रमांक धारकाची ओळख कोणत्याही वेळी, कोठेही त्वरीत वैध होऊ शकेल.
यूआयडीएआय आधार आधारिक प्रमाणीकरणाचा प्रस्ताव देते, ज्यामुळे विनंती करणाऱ्या संस्थांना (सरकारी/ सार्वजनिक आणि खाजगी संस्था/एजन्सी) यांना सेवा उपलब्ध होतात. यूआयडीएआय कडून या सेवा विनंती करणाऱ्या संस्था यांना त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही सेवा/सब्सिडी/लाभ/ व्यावसायिक कामे/परिसर देण्यापूर्वी त्यांचे ग्राहक/कर्मचारी/इतर सहकारी(त्यांच्या वैयक्तिक ओळख माहितीच्या जुळणीवर आधारित) यांच्या ओळखीचे प्रमाणीकरण करण्यासाठी वापरू शकतात (त्यांच्या खाजगी ओळखीच्या माहितीशी जुळण्याच्या आधारे).
प्रमाणीकरणाचे प्रकार
- विनंती करणाऱ्या संस्थेने प्राधिकरणाद्वारे घालून दिलेली नियमावली तसेच स्पेसिफिकेशन्स यांचे पुष्टीकरण करून पाठवलेल्या ऑनलाईन विनंतीवरच प्राधिकरण कोणत्याही प्रमाणीकरणाच्या विनंतीचा विचार करते.
- प्रमाणीकरण खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने केले जाऊ शकतेः
-
- जनसांख्यिकीय प्रमाणीकरणः आधार क्रमांक धारकाकडून मिळवलेली आधार क्रमांक आणि जनसांख्यिकीय माहिती त्या आधार क्रमांक धारकाच्या सीआयडीआर मध्ये साठवून ठेवलेल्या जनसांख्यिक माहितीशी पडताळून पाहिली जाते.
- वन टाईम पिन आधारित प्रमाणीकरणः मर्यादित वैधता असलेला वन टाईम पिन (ओटीपी) आधार क्रमांक धारकाच्या प्राधिकरणाकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि/ अथवा ई-मेल पत्त्यावर पाठविला जातो, किंवा तो इतर योग्य मार्गांनी तयार केला जातो. प्रमाणीकरण करतेवेळी आधार क्रमांक धारकाने हा ओटीपी व त्यासोबत आपला आधार क्रमांक देणे आवश्यक असते व तो ओटीपी प्राधिकरणाने तयार केलेल्या ओटीपी शी जुळणे आवश्यक असते.
- बायोमेट्रीक आधारावरील प्रमाणीकरणः आधार क्रमांक धारकाकडून मिळवलेला आधार क्रमांक आणि बायोमेट्रीक माहिती त्या आधार क्रमांक धारकाच्या सीआयडीआर मध्ये साठवून ठेवलेल्या बायोमेट्रीक माहितीशी पडताळून पाहिली जाते. यात त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे किंवा बुबुळे यांवर आधारित प्रमाणीकरण केले जाते किंवा सीआयडीआर मध्ये साठवलेल्या अन्य बायोमेट्रीक साधनांवर प्रमाणीकरण केले जाते.
- बहुघटक प्रमाणीकरणः वरील प्रकारांपैकी दोन किंवा अधिक प्रकार प्रमाणीकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
- विनंती करणारी संस्था त्यांच्या व्यावसायिक कार्यांतील आवश्यकतांनुसार उपनियम (२) मध्ये दिलेल्या कोणत्याही सुयोग्य प्रमाणीकरणाच्या प्रकाराचा वापर करू शकते, ज्यात अधिक सुरक्षेसाठी प्रमाणीकरणाचे बहुविध घटक असू शकतात. शंका टाळण्यासाठी असे स्पष्ट करण्यात येते की, ई-केवायसी प्रमाणीकरण फक्त ओटीपी आणि/अथवा बायोमेट्रीक प्रमाणीकरणाचा वापर करून केले जाते.
प्रमाणीकरण करण्यासाठी आधार क्रमांक धारकाची संमती मिळवणे
स्वतंत्र व्यक्तीला सब्सिडी, लाभ किंवा सेवा प्राप्त करण्यातील एक शर्त म्हणून स्वतंत्र व्यक्तीची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने केंद्र/ राज्य सरकार त्याचे प्रमाणीकरण मागू शकते किंवा त्याला आपल्या ताब्यातील आधार क्रमांक सादर करण्यास सांगू शकते किंवा ज्या व्यक्तीला आधार क्रमांक देण्यात आलेला नसेल, ती व्यक्ती आधार क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करू शकते.
व्यक्तीला आधार क्रमांक देण्यात आला नसेल, तर त्या व्यक्तीला अशी सब्सिडी, लाभ किंवा सेवा मिळवण्यासाठी आपल्या ओळखीचे इतर पर्यायी पुरावे आणि व्यवहार्य साधने सादर करावी लागतात.
आधार अधिनियमाच्या अनुपालनामध्ये सर्व विनंती करणाऱ्या संस्था किंवा सेवा प्रदात्यांनी खालील गोष्टी करणे आवश्यक आहेः
- जोपर्यंत अधिनियमात तरतुद केली नसेल, तोपर्यंत प्रमाणीकरणाच्या उद्देशासाठी त्याच्या/तिच्या ओळखीची माहिती मिळवण्यापूर्वी त्या व्यक्तीची संमती मिळवणे यूआयडीएआय धोरणे व नियमावली प्रमाणे अनिवार्य आहे.
- व्यक्तीची ओळख माहिती सीआयडीआर यांच्याकडे केवळ प्रमाणीकरण करण्यासाठीच सादर केली जाईल हे सुनिश्चित करणे.
या आधार अधिनियमात असे काहीही देण्यात आलेले नाही की, व्यक्तीला राज्य किंवा अन्य कॉर्पोरेट किंवा इतर व्यक्ती यांच्याकडून कायद्यानुसार कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याचा आधार क्रमांक देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
परंतु आधार क्रमांकाचा वापर अधिनियमाच्या अध्याय ६ मधील कलम ८ अंतर्गत असलेल्या प्रक्रिया व दायित्वांच्या अंतर्गत अधीन राहून केला जाईल.
प्रमाणीकरण सेवा
प्रमाणीकरण सेवा यूआयडीएआयच्या दोन उदा. हेब्बल डेटा सेंटर(एचडीसी) आणि मनेसर डेटा सेंटर (एमडीसी) या केंद्राद्वारे ऑनलाइन आणि रिअल-टाईम पद्धतीमध्ये प्रदान केली आहे, जिथे ऑनलाइन सेवा प्रमाणीकरण आणि ई-केवायसी सारख्या अन्य सेवांसाठी, सेवांची उच्च उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय-सक्रिय मोडमध्ये वापरल्या जातात.
यूआयडीएआय यांचे सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (सीआयडीआर) हे दैनंदिन स्वरुपात लाखो प्रमाणीकरणे हाताळण्यासाठी सक्षम आहे व मागणी वाढल्यानंतर देखील त्याचे परिमाण वाढवले जाऊ शकते. आधार क्रमांक धारकांना सेवा देणाऱ्या बऱ्याच विनंती करणाऱ्या संस्थांनी त्यांच्या डोमेन एप्लिकेशन्स मध्ये आधार अंतर्भुत केले आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या सेवा देशभरात कोठेही रियल टाईम, स्केलेबल, अंतर-संचालित व सुधारित स्वरूपात देता येतात.