युआयडीएआय प्राधिकरणाची रचना

Dr. Anand Deshpande, Member (part-time), UIDAI

डॉ.आनंद देशपांडे

सदस्य (अर्ध-वेळ), युआयडीएआय

डॉ.आनंद देशपांडे यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा च्या (युआयडीएआय) अर्ध-वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.आनंद देशपांडे, हे पर्सिस्टिंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून, त्यांनी आयआयटी खरगपूर मधून संगणक विज्ञान व अभियांत्रिकीत बी.टेक (पदवी) व अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठ, ब्लुमिंग्टन, इंडियाना येथून संगणक विज्ञानातील एम.एस. व पी.एचडी. केलेले आहे.

1990 साली पर्सिस्टंट सिस्टिम्सची स्थापना झाल्यापासून, कंपनीला जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी बनविण्यात डॉ. आनंद देशपांडे सिंहाचा वाटा आहे.

Dr. Saurabh Garg, CEO, UIDAI

डॉ. सौरभ गर्ग

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), यूआयडीएआय

डॉ.सौरभ गर्ग हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यापूर्वी कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण, ओडिसाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी शेती डिज़िटाइज़ेशन आणि शेतकऱ्यांसाठी थेट उत्पन्न हस्तांतरण योजना विकसित करण्याचे काम केले. डॉ गर्ग यांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात काम केले असून, त्यांनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF) च्या स्थापनेचे नेतृत्व केले. थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणे सुधारण्यावर काम केले; तसेच डिजिटल पेमेंटसाठी फ्रेमवर्क तयार करणे; सुवर्ण क्षेत्राच्या धोरणांमध्ये सुधारणा केली आणि द्विपक्षीय गुंतवणूक करारांसाठी (बीआयटी) वाटाघाटीचे नेतृत्व केले. डॉ गर्ग हे अर्थ मंत्रालय, नीति आयोग, आरबीआय आणि सेबी इत्यादी 'कार्यसमूहांचे सदस्य आहेत. 'कमोडिटीज स्पॉट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट्सचे एकत्रीकरण, 'डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन, आणि आभासी / क्रिप्टो चलनांबाबत फ्रेमवर्क, तसेच शहरी आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या क्षेत्रातही काम केले आहे.

डॉ सौरभ गर्ग हे ओडिसा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. आणि त्यांना सरकार, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व केंद्र सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील विविध स्तरांवर काम करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. डॉ गर्ग हे वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतासाठी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात जागतिक बँकेबरोबर सल्लागार म्हणूनही काम केले आहे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक राहिले आहेत.

डॉ. गर्ग यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, यूएसए मधून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि विकास मध्ये पीएच.डी केलेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून एमबीए केले असून ते सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. तसेच बि टेक भारतीय तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे केलेली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, येथे गुरुकुल फेलोशिप मिळालेली आहे.

प्रशासनातील नवकल्पना, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आणि आर्थिक समावेश यासह विविध क्षेत्रात पुस्तक आणि लेख प्रकाशित केले आहे.