वित्त पुरवठा व अर्थसंकल्प
वित्त पुरवठा व अर्थसंकल्प
युआयडीएआय वित्त पुरवठा विभाग
वित्त विभागाच्या प्रमुखपदी उप महासंचालक (वित्त पुरवठा) असतात, जे युआयडीएआयचे आर्थिक सल्लागार आहेत. एफडी आर्थिक परिणामांशी संबंधित सर्व मुद्यांवर महासंचालकांना व मोहीम संचालकांना सल्ला देतो.
एफडी अर्थसंकल्प निर्मिती, निष्पत्ती अर्थसंकल्प, कामगिरी अर्थसंकल्प, व्यय व रोख व्यवस्थापन व आर्थिक परिणामांचा समावेश असलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी जबाबदार असतो.
युआयडीएआय वित्त पुरवठा विभागाची भूमिका
आर्थिक सल्ला/सहकार्य
- आर्थिक परिणामांचे योग्यप्रकारे मूल्यमापन करता यावे यासाठी धोरण व कार्यक्रम निर्मिती उपक्रमांना सहकार्य;
- कॅबिनेट/ईएफसी/एसएफसी प्रस्तावांविषयी व सुधारित खर्च अंदाज प्रस्तावांविषयी सल्ला देणे;
- आर्थिक अधिकार देण्याविषयी सल्ला देणे;
- सर्व विषयांवर आर्थिक सल्ला देणे ज्यामध्ये गरजेचा स्वीकार (एओएन) व सीएफएची खर्चाच्या दृष्टिकोनातून (ईएएस) मंजूरी यासाठीच्या आर्थिक प्रस्तावांवर सरकारी खर्चाचा/सहकार्याचा समावेश होतो.
- प्रस्तावांचे नियम व कायदा, संचालनात्मक गरजा व आवश्यक असलेले प्रयत्न या दृष्टिकोनातून मूल्यमापन व मूल्यांकन;
- निविदा/आरएफपी, कंत्राटांविषयी अंतिम निर्णय घेणे, ज्यामध्ये कंत्राटाच्या आर्थिक बाजूमध्ये सुधारणा करण्याचाही समावेश होतो;
- विविध समित्यांवर वित्तीय प्रतिनिधींचे नामनिर्देशन व सहभाग (सीएबी, निविदा उघडणे व मूल्यमापन समित्या, व्यावसायिक वाटाघाटी समित्या, इतर समित्या); व
- अंतर्गत नियंत्रण यंत्रणा खरेदी नियमपुस्तिकेद्वारे विविध खरेदी व कंत्राटांच्या संदर्भात अर्थ मंत्रालयाच्या नियमांना व अटींना ‘पुरेसे महत्व’ दिले जाईल व त्यांचे पालन होईल याची खात्री करेल.
अर्थसंकल्प तयार करणे
- अर्थसंकल्प तयार करणे व संबंधित काम (अर्थसंकल्पीय अंदाज, सुधारित अंदाज व पुरवणी अनुदान);
- मुख्यालय व प्रादेशिक कार्यालयांच्या कार्यकारी विभागांमध्ये अर्थसंकल्पाची कामे वितरित करणे;
- अंतिम गरजा तयार करणे, बचत वेळीच समर्पित करणे व पुन्हा-विनियोग करणे; व
- युआयडीएआयशी संबंधित प्रकरणांसाठी संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीमध्ये काम करणे.
खर्चाचे निरीक्षण
- मंजूर झालेल्या अनुदानानुसार दर महिन्याला खर्चाच्या प्रगतीचे निरीक्षण व आढावा;
- व्यय विभागाने अर्थव्यवस्था/खर्च करणे याविषयी दिलेल्या सूचनांचे पालन होईल याची खात्री करणे; व
- वेतन व लेखा कार्यालयाच्या (पीएओ) कामाचे निरीक्षण करणे.
अंतर्गत लेखा परीक्षण
- अंतर्गत लेखा योजना तयार करणे (मुख्यालयाचे तिमाही लेखा परीक्षण, मुख्यालयाच्या कार्यकारी विभागांचे वार्षिक कामगिरी लेखा परीक्षण व आरओ/तंत्रज्ञान केंद्राचे वार्षिक लेखा परीक्षण) व त्यासाठी मनुष्यबळ तैनात करणे;
- अंतर्गत लेखा अहवालास अंतिम स्वरुप देणे व तो संबंधित विभाग/आरओ/तंत्रज्ञान केंद्रांना देणे; व
- अंतर्गत लेखा निरीक्षणांचे पालन केले जात आहे का याचा पाठपुरावा.
इतर कामे
- युआयडीएआयच्या संदर्भात कॅग/पीएसी/लेखा परिच्छेद यांच्याशी संबधित प्रकरणे;
- लेखा महासंचालक, सीई, नवी दिल्ली यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या लेखा परिच्छेदांविषयी कार्यकारी विभागांचे उत्तर/पालन याविषयी अंतिम निर्णय घेणे
- कॅग परिच्छेदांवर कृती अहवाल तयार करणे
- वार्षिक अहवाल, आर्थिक सर्वेक्षण, मासिक पीएमओ अहवालासाठी माहिती देणे; व
- युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांच्या विदेशात प्रतिनियुक्तीच्या प्रस्तावांची पडताळणी व सहमती
अर्थसंकल्प व खर्च
युआयडीएआयच्या स्थापनेपासून अर्थसंकल्प व खर्च:
Year |
Budget Estimates (in Crore) INR |
Revised Estimates (in Crore)INR |
Expenditure (in Crore) INR |
---|---|---|---|
2009-10 |
120.00 |
26.38 |
26.21 |
2010-11 |
1,900.00 |
273.80 |
268.41 |
2011-12 |
1,470.00 |
1,200.00 |
1,187.50 |
2012-13 |
1,758.00 |
1,350.00 |
1,338.72 |
2013-14 |
2,620.00 |
1,550.00 |
1,544.44 |
2014-15 |
2,039.64 |
1,617.73 |
1,615.34 |
2015-16 |
2,000.00 |
1880.93 |
1680.44 |
2016-17 |
1140.00 |
1135.27 |
1132.84 |
2017-18 |
900.00 |
1150.00 |
1149.38 |
2018-19 |
1375.00 |
1345.00 |
1181.86 |
2019-20 |
1227.00 |
836.78 |
856.13$ |
2020-21 |
985.00 |
613.00 |
893.27* |
2021-22 |
600.00 |
1564.97 |
1564.53 |
2022-23 |
1110.00 |
1220.00** |
1634.44# |
2023-24 |
940.00 |
800 |
1396.22@ |
- $Excess expenditure met from unspent grant of 2018-19
- *Excess expenditure met from unspent grant of 2018-19 & 2019-20 and UIDAI Fund
- **Including Rs.110 crore received as supplementary grant
- #Excess expenditure met from UIDAI Receipt.
- @ Expenditure upto September 2024
संदर्भ
आमच्यावरील जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आम्हाला खालील प्रकाशनांकडून मार्गदर्शन मिळाले आहे :
- सामान्य वित्त नियम, २०१७
- यूआयडीएआय प्राप्ती मॅन्युअल
- वित्त मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सीव्हीसी, इ. कडून जारी करण्यात आलेल्या इतर सूचना.
संघटना तक्ता
उप महासंचालकांना (वित्त) पुढील चमू मदत करतो:
Summarized Financial position as on 30th September 2024
(Rs. In Crore) | |||||
---|---|---|---|---|---|
Grants Head |
BE 2024-25 |
Funds Released by MeitY |
Consolidated Expenditure upto August, 2024 |
Expenditure during September, 2024 |
Consolidated Expenditure upto September, 2024 |
31- Grants in Aid: General |
417.00 |
264.00 |
288.86 |
126.32 |
415.18* |
35- Grants for creation of capital assets |
110.00 |
70.00 |
19.88 |
37.17 |
57.05 |
36- Grants-in-aid salaries |
73.00 |
44.00 |
27.94 |
5.35 |
33.29 |
Total |
600.00 |
378.00 |
336.68 |
168.84 |
505.52 |