आधार नावनोंदणी
आधार नावनोंदणी प्रक्रियेमध्ये नावनोंदणी केंद्राला भेट देणे, नावनोंदणी अर्ज भरणे, जनसांख्यिकीय व जैवसांख्यिकीय डेटा नोंदवणे, ओळखीचा दाखला व पत्त्याचे दस्तऐवज सादर करणे, त्यानंतर नावनोंदणी क्रमांकाचा समावेश असलेली पोचपावती घेणे यांचा समावेश होतो. आधार नावनोंदणीची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- आधारसाठी नावनोंदणी निःशुल्क आहे.
- तुम्ही भारतात कुठेही अधिकृत आधार नावनोंदणी केंद्रात तुमची ओळख व पत्त्याच्या पुराव्यासह जाऊ शकता.
- युआयडीएआय प्रक्रिया १८ पीओआय (ओळखीचा पुरावा) व ३३ पीओए (पत्त्याचा पुरावा) दस्तऐवज स्वीकारते. कृपया राष्ट्रीय पातळीवर वैध मानल्या जाणा-या दस्तऐवजांच्या यादीसाठी इथे क्लिक करा. मतदार ओळख पत्र, शिधा पत्रिका, पार पत्र व चालक परवाना हे सर्वसामान्यपणे ओळख व पत्त्याचा पुराव्यासाठी वापरले जाणारे पुरावे आहेत.
- पॅन कार्ड व सरकारी ओळख कार्ड यासारख्या छायाचित्र असलेल्या ओळख कार्डांना ओळखीच्या पुराव्यासाठी परवानगी आहे. पाणी पुरवठा, वीज व दूरध्वनी यांच्या गेल्या तीन महिन्यातील बिलांचा पत्त्याच्या पुराव्याच्या दस्तऐवजांमध्ये समावेश होतो.
- जर तुमच्याकडे वरील सर्वसामान्यपणे वापरले जाणारे पुरावे नसतील तर रात्रपत्रित अधिकारी/तहसीलदार यांच्या लेटरहेडवर छायाचित्रासहित देण्यात आलेले ओळखीचे प्रमाणपत्र पीओआय म्हणून स्वीकारले जाते. खासदार किंवा आमदार/राजपत्रित अधिकारी/तहसीलदार किंवा सरपंच किंवा समकक्ष अधिकारी (ग्रामीण भागासाठी) यांनी लेटरहेडवर छायाचित्रासहित दिलेले पत्त्याचे प्रमाणपत्र वैध पीओए म्हणून स्वीकारले जाते.
- कुटुंबातील एखाद्या व्यक्तिकडे वैयक्तिक वैध दस्तऐवज नसले, तरी त्याचे/तिचे नाव कौटुंबिक हक्क दस्तऐवजांमध्ये असल्यास ती नावनोंदणी करु शकते. अशा वेळी हक्काच्या दस्तऐवजांमध्ये नमूद केलेल्या कुटुंब प्रमुखाने वैध पीओआय व पीओए दस्तऐवजांसहित सर्वप्रथम नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबप्रमुख कुटुंबातील इतर सदस्य नावनोंदणी करताना त्यांचा परिचय देऊ शकतो. युआयडीएआय नातेसंबंधांचा पुरावा म्हणून ८ प्रकारचे दस्तऐवज स्वीकारते. कृपया राष्ट्रीय पातळीवर वैध दस्तऐवजांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नसल्यास, निवासी नावनोंदणी केंद्रावर उपलब्ध असलेल्या परिचयकर्त्यांची मदतही घेऊ शकतात. हे परिचयकर्ते निबंधकांनी अधिसूचित केलेले असतात. अधिक तपशीलांसाठी संबंधित निबंधकांच्या कार्यालयास संपर्क करा.
थोडक्यात, नावनोंदणी तीन प्रकारे करता येते:
दस्तऐवजांवर आधारित
- ओळखीचा एक वैध दाखला (पीओआय) व पत्त्याचा एक वैध दाखला (पीओए) सादर करणे.
कुटुंबप्रमुखावर (एचओएफ) आधारित
- कुटुंब प्रमुख (एचओएफ) दस्तऐवजांच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांना प्रस्तावित करु शकतो, हा दस्तऐवज नाते सिद्ध करणारा दाखला (पीओआर) असावा.
प्रस्तावकावर आधारित
- ओळखीचा वैध दाखला (पीओआय) व पत्त्याचा वैध दाखला (पीओए) नसल्यास प्रस्तावकाची सेवा घेता येऊ शकते. निबंधक प्रस्तावकाची नियुक्ती करतात व त्याच्याकडे वैध आधार क्रमांक असला पाहिजे
- नावनोंदणी केंद्रावर, कृपया नावनोंदणी अर्जात तुमचे वैयक्तिक तपशील भरा. नावनोंदणीचा एक भाग म्हणून तुमचे छायाचित्र, बोटांचे ठसे व डोळ्यांच्या बाहुलीचे स्कॅन केले जाईल.तुम्ही नावनोंदणीच्या वेळीच दिलेला तपशील तपासून पाहू शकता व त्यात बदल करु शकता. तुम्हाला तात्पुरता नावनोंदणी क्रमांक व नावनोंदणीच्या वेळी घेतलेल्या इतर तपशीलांसह पोचपावती मिळेल. नावनोंदणीनंतर ९६ तासात पोचपावतीसह नावनोंदणी केंद्राला भेट देऊन नावनोंदणी डेटामध्ये कोणतीही दुरुस्ती करता येते.
- तुम्ही केवळ एकदाच नावनोंदणी केली पाहिजे, कारण अनेकदा नावनोंदणी केल्यामुळे ती फेटाळली जाईल याला केवळ युआयडीएआयने सल्ला दिला असल्यास अपवाद असेल.
- आधारसाठीचा प्रतीक्षा कालावधी सीआयडीआरमध्ये रहिवासी डेटा पॅकेट मिळाल्यानंतर ६०-९० दिवसांचा असू शकतो.
कुठे नावनोंदणी करायची
आधार नावनोंदणीची कामे आरजीआयद्वारे आसाम व मेघालयमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंद (एनपीआर) ) तयार करण्यासोबत व्यापक प्रमाणावर केली जात आहेत. इतर सर्व राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील रहिवाशांनी केवळ आधार नावनोंदणी केंद्र/आधार शिबीर किंवा कायमस्वरुपी नावनोंदणी केंद्रावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.