युआयडीएआय यंत्रणेतील सुरक्षा
युआयडी प्रकल्पाच्या रचनेचा व्यक्ती व त्यांची माहिती सुरक्षित ठेवणे हा अविभाज्य भाग आहे.व्यक्तिविषयी कोणतीही माहिती उघड न करणाऱ्या स्वैर क्रमांकापासून ते खाली दिलेल्या इतर वैशिष्ट्यांमुळे, युआयडीचे हेतू व उद्दिष्टांमध्ये रहिवाश्याचे हित केंद्रस्थानी आहे.
मर्यादित माहिती संकलित करणे: युआयडीएआयद्वारे संकलित केला जाणारा डेटा फक्त आधार देण्यासाठीच व आधारधारकांची ओळख पटविण्यासाठी असतो. युआयडीएआय ओळख सिद्ध करता यावी यासाठी अगदी मूलभूत क्षेत्रातील डेटा संकलित करत आहे ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, आई-वडिल/पालकांचे नाव जे लहान मुलांसाठी आवश्यक असते, इतरांसाठी नाही, मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता जो देणे ऐच्छिक आहे यांचा समावेश होतो. युआयडीएआय वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी जैवसांख्यिक माहिती संकलित करत आहे, ज्यामध्ये छायाचित्र, 10 बोटांचे ठसे व डोळ्याच्या बाहुलीचा समावेश होतो.
तपशीलवार व मागोवा घेणारी माहिती संकलित केली जात नाही: युआयडीएआयच्या धोरणानुसार धर्म, जात, समुदाय, वर्ग, वंश, उत्पन्न व आरोग्य सारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती संकलित करता येत नाही.म्हणूनच युआयडीच्या यंत्रणेद्वारे व्यक्तिची तपशीलवार माहिती संकलित करणे शक्य नाही, म्हणूनच डेटा संकलन ओळखणे व ओळख सिद्ध करणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. खरतर युआयडीएआयने, सीएसओकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनुसार सुरुवातीला जी माहिती घ्यायचे ठरवले होते त्यामध्ये जन्मतारखेची चौकट वगळायचे ठरवले होते ज्यामुळे तपशीलवार माहिती संकलित केली जाऊ शकते. त्याचशिवाय युआयडीएआय व्यक्तिच्या व्यवहारांचे कोणतेही तपशील संकलित करत नाही.एखाद्या व्यक्तिने आधारद्वारे ओळख सिद्ध केल्यानंतर केवळ अशाप्रकारे ओळख सिद्ध झाली एवढेच नोंदींमध्ये दिसेल. ही मर्यादित माहिती अल्पकाळ रहिवाश्याच्या हितासाठी जपून ठेवली जाईल, म्हणजे कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करता येईल.
माहितीचे प्रसारण–होय किंवा नाही उत्तर: युआयडीएआय आधार डेटाबेसमधील वैयक्तिक माहिती जाहीर करू शकत नाही, ते केवळ एखादी ओळख पडताळण्याच्या विनंतीला होय किंवा नाही असे उत्तर देऊ शकते. याला केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात न्यायालयाचा आदेश, किंवा सह सचिवांनी दिलेल्या आदेशाचा अपवाद असेल.हा अतिशय न्याय्य अपवाद आहे व अतिशय स्पष्ट व नेमका आहे. अमेरिका व युरोपमध्ये सुरक्षेला काही धोका निर्माण झाल्यास डेटा उपलब्धतेविषयी ज्या सुरक्षा नियमांचे पालन केले जाते त्या धोरणानुसारच आहे.
डेटा सुरक्षा व गोपनीयता: युआयडीएआयवर संकलित केलेला डेटा सुरक्षित व गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. डेटा युआयडीएआयने दिलेल्या सॉफ्टवेअरवर संकलित केला जाईल व देवाणघेवाण करताना बाहेर जाऊ नये यासाठी त्याचे सांकेतिकरण केले जाईल. प्रशिक्षित व प्रमाणित नोंदणीकर्ता माहिती संकलित करतील, ज्यांना संकलित केलेला डेटा उपलब्ध होणार नाही. युआयडीएआयची आपला डेटा सुरक्षित व विश्वसनीय ठेवण्यासाठी व्यापक सुरक्षा धोरण आहे. यामध्ये अधिक तपशील जाहीर केले जातील, ज्यात माहिती सुरक्षा योजना व सीआयडीआरसाठी धोरणांचा व युआयडीएआयच्या व तिच्या कंत्राटी संस्थांच्या नियम पालनाच्या लेखापरीक्षणासाठीच्या यंत्रणेचा समावेश होतो. त्याशिवाय कडक सुरक्षा व साठवणूक आचारसंहिता लागू असेल. सुरक्षा नियमांच्या कोणत्याही उल्लंघनासाठी होणारा दंड अतिशय कडक असेल, व त्यामध्ये माहिती जाहीर करण्यासाठी दंडाचाही समावेश होतो. सीआयडीआरच्या अनधिकृत उपलब्धतेसाठी फौजदारी कारवाईही केली जाऊ शकते ज्यामध्ये हॅकिंगचा समावेश होतो, व सीआयडीआरमधील डेटात फेरफार करण्यासाठी दंड होऊ शकतो.
युआयडीएआय माहितीचे एकत्रिकरण व इतर डेटाबेसशी संलग्नता: युआयडी डेटाबेस इतर कोणत्याही डेटाबेसशी, किंवा इतर डेटाबेसमधील कोणत्याही माहितीशी जोडलेला नाही.याचा केवळ एकमेव हेतू आहे, तो म्हणजे व्यक्तिची ओळख, आधारधारकाच्या संमतीनेच सेवा घेतेवेळी सिद्ध करणे. युआयडी डेटाबेसचे उच्चाधिकार असलेल्या निवडक व्यक्तिंद्वारे प्रत्यक्ष व इलेक्ट्रॉनिकपद्धतीने संरक्षण केले जाईल. तो युआयडीच्या कर्मचाऱ्यांपैकीही बऱ्याच सदस्यांना उपलब्ध असणार नाही व सर्वोत्तम सांकेतिकरणाद्वारे व अतिसुरक्षित डेटा कक्षात सुरक्षित ठेवला जाईल. सर्व उपलब्धता तपशीलांची व्यवस्थित नोंद केली जाईल.