आधारचा वापर

भारत सरकार गरीब आणि समाजातील वंचित घटकांसाठी अनेक समाज कल्याण योजनांना निधी देते.आधार व त्याच्या प्लॅटफॉर्मुळे सरकारला कल्याणकारी योजनांचे लाभ वितरित करणारी यंत्रणा सुरळीत करण्याची व त्याद्वारे कामकाजात पादर्शकता आणण्याची व चांगले प्रशासन देण्याची विशेष संधी मिळाली आहे.

सरकारे आणि सेवा संस्थांसाठी

युआयडीएआय संपूर्ण डेटाबेसमधून जनसांख्यिक व जैवसांख्यिक वैशिष्ट्यांची नक्कल नष्ट केल्यानंतरच रहिवाशांना आधार क्रमांक देते. आधार प्रमाणीकरणामुळे विविध योजनांमध्ये असलेले खोटे लाभार्थी नष्ट केले जातात व त्यामुळे सरकारी खजिन्याची मोठी बचत होईल अशी अपेक्षा आहे.त्याचबरोबर आधारमुळे सरकारला लाभधारकांचा अचूक डाटा दिला जातो, थेट फायदा देंणारे उपक्रम राबवले जाऊ शकतात, आणि सरकारी खाती/सेवा प्रदाते यांना विविध योजनांचा समन्वय साधता येतो आणि त्यांचा जास्तीत जास्त चांगला वापर करता येतो. आधारमुळे अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना लाभार्थींची पडताळणी करता येईल व योग्य लाभार्थींपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवता येतील. या सर्व उपक्रमांमुळे पुढील बाबी होतील:

केंद्रित वितरणामुळे गळती कमी होईल: ज्या कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये सेवा वितरणापूर्वी लाभार्थींची खात्री करणे आवश्यक असते त्यांना युआयडीएआयच्या प्रमाणीकरण सेवांचा लाभ होतो. यामुळे गळती कमी होईल व सेवा केवळ योग्य लाभार्थींनाच दिल्या जातील याची खात्री केली जाईल. याच्या उदाहरणांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे (पीडीएस) स्वस्त धान्य व केरोसीनची विक्री, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) लाभार्थींचा हजेरीपट, इत्यादींचा समावेश होतो.

कार्यक्षमता व परिणामकारकता सुधारणे: आधार प्लॅटफॉर्म सेवा वितरण यंत्रणेविषयी अचूक व पादर्शक माहिती देत असल्यामुळे, सरकार वितरण यंत्रणा सुधारू शकते व कमीत कमी विकास निधी जास्तीत जास्त परिणामकारकपणे व कार्यक्षमपणे वापरू शकते, ज्यामध्ये सेवा वितरणाच्या जाळ्यात सहभागी असलेल्या मनुष्यबळाचा अधिक चांगल्याप्रकारे वापर करण्याचाही समावेश होतो.

रहिवाशांसाठी

आधार यंत्रणा रहिवाशांना संपूर्ण देशभर एकाच स्रोताद्वारे ऑनलाईन ओळख पडताळणीची सोय देते. रहिवाशांनी एकदा नावनोंदणी केल्यानंतर, ते इलेक्ट्रॉनिक माध्यमाने अनेक वेळा त्यांची ओळख प्रमाणित करण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करू शकतात.त्याच्यामुळे बँक खाते उघडणे, वाहनचालक परवाना काढणे इत्यादी सेवा घेण्यासाठी प्रत्येकवेळी ओळखीची सहाय्यक कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याचे कष्ट वाचतात.आधार प्रमाणीकरणाद्वारे कधीही, कुठेही ऑनलाईन प्रमाणित करता येईल असा ओळखीचा स्थलांतरणीय दाखला मिळाल्याने,आधार यंत्रणेमुळे देशातील लक्षवधी लोकांना एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करणे सोपे झाले आहे.