नावनोंदणी संस्था
नावनोंदणी संस्था या निबंधकांनी रहिवाशांच्या नावनोंदणीसाठी नियुक्त केलेल्या संस्था असतात ज्या युआयडीएआयच्या नावनोंदणी प्रक्रियेनुसार जनसांख्यिक व जैवसांख्यिक डेटा संकलित करतात. नावनोंदणी संस्थांनी निबंधकांसोबत काम करण्यासाठी युआयडीएआयकडे कायम सूचीबद्ध असल्याची खात्री केली पाहिजे. जर निबंधकांनी बिगर-सूचीबद्ध संस्थांची नियुक्ती केली, तर त्यांनाही सूचीबद्ध संस्थांसारख्याच अटी व शर्ती लागू होतील.
- नावनोंदणी संस्था ही निबंधकांनी संघटनेचे स्वरूप, तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करून कंत्राटाद्वारे नियुक्त केलेली संस्था असते.
- नावनोंदणी संस्था क्षेत्रावरील नावनोंदणी केंद्रांसाठी परिचालक व पर्यवेक्षक पुरवतात, व तसेच रहिवाशांची जास्तीत जास्त नावनोंदणी व्हावी यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती तयार करतात.
- नावनोंदणी संस्थांनी रहिवासी व युआयडीएआयला नावनोंदणीचे वेळापत्रक पुरेसे आधी कळवले पाहिजे.
- यशस्वीपणे आधार निर्मिती व्हावी यासाठी युआयडीएआय नावनोंदणी संस्थांना सूचीबद्ध करेल व निबंधक त्यांना पैसे देतील
- नावनोंदणी संस्था रहिवाशांच्या नावनोंदणीसाठी तसेच रहिवासी डेटामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यासाठी नावनोंदणी केंद्राची स्थापना करतील
- ईए केवळ युआयडीएआयने नावनोंदणीसाठी दिलेल्या सॉफ्टवेअरचाच उपयोग करेल. नावनोंदणी सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक नावनोंदणीमध्ये/सुधारणेसमोर नावनोंदणी पॅकेटचा भाग म्हणून लेखा डेटा नोंदविण्याची तरतूद असेल, ज्यामुळे नावनोंदणी केलेला ग्राहक, परिचालक, पर्यवेक्षक, नावनोंदणी संस्था, निबंधक, व कोणतीही इतर माहिती सहज शोधता येईल.
- संगणक, प्रिंटर, जैवसांख्यिक उपकरणे यासारखी साधने व इतर सामग्री युआयडीएआयने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांनुसार असेल.
- नावनोंदणीसाठी वापरली जाणारी जैवसांख्यिक साधने प्राधिकरणाद्वारे विहित नियमांची पूर्तता करतील तसेच युआयडीएआयने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार प्रमाणितही केली जातील.
- नावनोंदणी परिचालक सहाय्यक दस्तऐवजांची छापील/इलेक्ट्रॉनिक प्रत गोळा करतील किंवा युआयडीएआयने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतरित करतील
- नावनोंदणी संस्था क्षेत्र पातळीवरील अंमलबजावणी व लेखा परीक्षणासाठी जबाबदार असेल. नावनोंदणी संस्था तिने किंवा तिच्यावतीने काम करणारी इतर व्यक्ती ज्या परिसरात काम करत आहे तो प्राधिकरणाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देतील व तसेच नावनोंदणी संस्थेच्या किंवा त्यांच्यावतीने काम करणाऱ्या इतर कुणाही व्यक्तिच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही नोंदवह्या, नोंदी, दस्तऐवज व संगणक डेटा तपासण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देतील तसेच लेखा परीक्षणासाठी प्राधिकरणाच्या मते आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तऐवजाच्या किंवा इतर साहित्याच्या प्रती देतील.
- नावनोंदणी संस्था नेहमी नावनोंदणी संस्थेसाठीच्या आचारसंहितेचे पालन करेल
- नावनोंदणी संस्था प्राधिकरणाने वेळोवेळी प्रसारित केलेल्या विविध प्रक्रिया, धोरणे व मार्गदर्शक तत्वांचे, तपासयाद्यांचे, अर्जांचे व नमुन्यांचे पालन करेल.
नावनोंदणी संस्थेची कामे
- नावनोंदणी केंद्र स्थापन करण्यासाठी तपास यादीनुसार साधने व इतर आवश्यक बाबींची खरेदी
- परिचालक/पर्यवेक्षकांची नियुक्ती करणे व त्यांची युआयडीएआयमध्ये नावनोंदणी करणे व त्यांना सक्रिय करणे
- पहिल्या परिचालकाची अधिकृत ईएद्वारे नियुक्ती करून घेणे
- सीआयडीआरला या परिचालकासाठी डेटा पॅकेट व वापरकर्ता व्यवस्थापन पत्रक पाठवणे
- युआयडी स्वीकारणे व या संचालकाला इतरांची नावनोंदणी करण्यासाठी परवानगी देणे.
- इतर परिचालक/पर्यवेक्षक व तांत्रिक प्रशासक, तसेच शक्य असल्यास प्रस्तावकाचीही, पहिल्या परिचालकाकडून नावनोंदणी करून घेणे
- त्यांची डेटा पॅकेट व वापरकर्ता व्यवस्थापन फाईल सीआयडीआरला पाठवणे
- युआयडी स्वीकारणे
- त्यांची TCA द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रमाणन परीक्षेसाठी नावनोंदणी करणे
- सीआयडीआरमध्ये प्रमाणित व नोंदणीकृत कर्मचारी इतर प्रस्ताव, रहिवाशांची नावनोंदणी करायला सुरुवात करू शकतात.
- केंद्र नोंदणी
- ईए तांत्रिक प्रशासकाच्या ईमेल पत्त्यावर ईए अधिकृत वापरकर्ता व कोड घेणे
- युआयडीएआयकडून निबंधक कोड, ईए कोड घेणे
- अद्ययावत आधार सॉफ्टवेअर घेणे व इन्स्टॉल करणे, ग्राहक लॅपटॉपची नोंदणी वसंरचना करणे
- वापरकर्ता मांडणी व केवायआर व केवायआर+ साठीचाचणी प्रसारण पूर्ण करणे
- केंद्र वेळोवेळी अद्ययावत ठेवणे