प्रमाणीकरण वापरकर्ता एजन्सी

परिचय

एएसए म्हणजे सीआयडीआर यांच्याशी यूआयडीएआय यांच्या आदर्श व स्पेसिफिकेशन्स नुसार सुरक्षित लिझ्ड ऑनलाईन कनेक्टिव्हीटी स्थापन करणारी संस्था. एएसए विनंती करणाऱ्या संस्थांना (एयूए/केयूए) यूआयडीएआय कंप्लायंट नेटवर्क कनेक्टिव्हीटी सेवा म्हणून देते आणि त्यांच्या प्रमाणीकरणाच्या विनंती सीआयडीआर कडे प्रसारित करते.

प्रमाणीकरण सेवा संस्थांची नेमणूक

  • ज्या संस्था प्रमाणीकरण सेवा संस्थात म्हणून आपली नेमणूक करू इच्छितात, त्यांना आपल्या नेमणुकी करिता प्राधिकरणाकडे विहित प्रक्रियेनुसार अर्ज करावा लाहतो. ज्या संस्था अनुसूची बी प्रमाणे निकष पूर्ण करतात, त्या अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात. प्राधिकरण आदेशाने अनुसूची बी मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार पात्रतेचे निकष सुधारीत करू शकते.
  • प्रमाणीकरण सेवा संस्थेच्या कार्याशी संबंधित प्रकरणांत प्राधिकरण त्याला आवश्यक वाटल्याप्रमाणे अर्जदाराकडून अधिक माहिती, स्पष्टीकरण मागवू शकते, अर्ज निकाली काढू शकते.
  • अर्जदाराने प्राधिकरणाचे समाधान होईल अशाप्रकारे अधिक माहिती व स्पष्टीकरण प्राधिकरणाने विहित केलेल्या कालावधीच्या आत देणे आवश्यक आहे.
  • अर्जावर विचार करताना अर्जदाराने दिलेली माहिती व त्याची पात्रता प्राधिकरण कागदपत्रांचे सत्यापन करून, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक सहाय्य यांचे भौतिक सत्यापन करून तपासून पाहू शकते.
  • अर्ज, कागदपत्रे, अर्जदाराने दिलेली माहिती यांचे सत्यापन केल्यानंतर व अर्जदाराची पात्रता तपासून पाहिल्यानंतर प्राधिकरण खालीलप्रमाणे कृत्ये करू शकतेः
    प्रमाणीकरण सेवा एजन्सी करिता अर्ज मंजूर करू शकते, जसे असेल तसे; आणि
    ब. एएसए च्या वापरासाठी संस्था किंवा एजन्सी सोबत योग्य त्या अटी व शर्तींसह करार प्रवेशित करू शकते, त्यात नुकसान आणि जबाबदाऱ्यांचे गैरपालन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा देखील समावेश असतो.
  • प्राधिकरण संस्थांची नियुक्ती करतेवेळी वेळोवेळी त्यांची फी व शुल्क निर्धारित करू शकते, ज्यात अर्जाची फी, वार्षिक वर्गणी आणि स्वतंत्र प्रमाणीकरण व्यवहाराची फी यांचा समावेश असतो.

एएसए च्या जबाबदाऱ्या आणि माहितीची सुरक्षितता

एएसए च्या जबाबदाऱ्या आणि माहितीच्या सुरक्षिततेकरिता आधार अधिनियम, २०१६ आणि नियमावली यांचा संदर्भ पहावा.