आधार प्रतीक चिन्ह
संकल्पना व प्रतीक चिन्ह
आधार हे तत्कालीन विशेष ओळख क्रमांकाचे (युआयडी) ब्रँड नाव आहे. युआयडीएआयद्वारे दिल्या जाणाऱ्या आधार क्रमांकाचे नाव व प्रतीक चिन्ह या कार्यक्रमाची अमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता विचारात घेऊन विकसित करण्यात आले आहे.
एकत्रितपणे, आधार ब्रँड (जो आधी ‘युआयडी’ नावाने ओळखला जायचा) व प्रतीक चिन्ह, देशभरातल्या सर्व लोकांना म्हणजेच भारताच्या प्रत्येक रहिवाशाला त्याच्या/तिच्या जनसांख्यिक व जैवसांख्यिक माहितीशी संबंधित, त्यांना भारतात कुठेही वापरता येईल असा व विविध प्रकारचे लाभ व सेवा उपलब्ध होण्यासाठी विशेष ओळख क्रमांक देण्याच्या युआयडीएआयच्याअधिकाराचे सार व गाभा दर्शवतात.
आधारचा अर्थएक प्रकारचा ‘पाया’, किंवा ‘सहाय्य’ असा होतो. हा शब्द भारतातील बहुतेक भाषांमध्ये आहे व म्हणूनच देशभरात युआयडीएआय कार्यक्रमाच्या ब्रँडिंगसाठी व संज्ञापनासाठी वापरला जाऊ शकतो.
त्याचशिवाय, आधार विशेष व केंद्रीयकृत, ऑनलाईन ओळख पडताळणीची खात्री देतो जो अनेक सेवा व अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी व बाजारपेठा अधिक व्यापक प्रमाणात जोडल्या जाव्यात यासाठी आधार म्हणून काम करतो.
आधार कोणत्याही रहिवाशाला आपल्या सेवा व संसाधने, कधीही, देशभरात कुठेही उपलब्ध करून घेण्याची क्षमता देतो.
ब्रँड मार्गदर्शक तत्व
आधार प्रतीक चिन्ह पूर्णपणे चौकोनी आकाराचे नाही. प्रतीक चिन्हाची रूंदी ही उंचीपेक्षा थोडीशी जास्त आहे, व त्याचा नेमका आकार दाखवणे आवश्यक आहे कारण ब्रँडप्रतिमेसाठी ते महत्वाचे आहे. नेहमी खाली दिलेल्या आकृतीच्या मोजमापाशी प्रतीक चिन्हाची मोजमापे पडताळून पाहा.