नावनोंदणी भागीदार

युआयडीएआय

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण या यंत्रणेच्या केंद्रस्थानी आहे, व या यंत्रणेतील विविध घटकांचे नाते कसे असावे, व मूलभूत पायाभूत सुविधा ठरविण्यासाठी जबाबदार आहे. यंत्रणेची कामगिरी मोजणे व तिचे निरीक्षण करण्यासाठी, तसेच तिला आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठीही जबाबदार आहे

निबंधक

निबंधक ही युआयडीएआयने व्यक्तिंच्या नावनोंदणीसाठी अधिकृत केलेली किंवा मान्यता दिलेली संस्था असते. त्या युआयडीएआयशी सामंजस्य कराराद्वारे भागीदारी करतात व त्यांना देण्यात आलेल्या भूमिकांचे व जबाबदाऱ्यांचे पालन करतात. निबंधक रहिवशांकडून डेटा गोळा करण्यात सक्रियपणे सहभागी होत असल्यामुळे, डेटा गोळा केला जातो त्या ठिकाणीच त्यांना तो उपलब्ध असतो. निबंधक रहिवाशांची नोंदणी स्वतः किंवा त्यांनी कंत्राट दिलेल्या नावनोंदणी संस्थांकडून करून घेतील. निबंधकांकडे सूचीबद्ध नावनोंदणी संस्थांशी किंवा त्यांना योग्य वाटणाऱ्या इतर कोणत्याही संस्थांशी, अशा संस्थांना कंत्राट देण्याच्या त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेचे पालन करून करार करण्याचा पर्याय असेल.

नावनोंदणी संस्था

नावनोंदणी संस्था म्हणजे प्राधिकरण किंवा निबंधकांनी, परिस्थिती असेल त्याप्रमाणे, नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान जनसांख्यिक व जैवसांख्यिक माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेली एक संस्था. युआयडीएआय संघटनेची आर्थिक व तांत्रिक क्षमता पडताळल्यानंतर या संस्थांचा यादीत समावेश करते. त्या प्रत्यक्ष क्षेत्रावरील कामांचे निरीक्षण करणे, क्षेत्र धोरणांचे पालन करणे, योग्य चालक/निरीक्षकाचे प्रशिक्षण आयोजित करणे, रहिवासी डेटा सीआयडीआरला वेळच्या वेळी पाठवला जात असल्याची खात्री करण्यासाठी जबाबदार असतात. नावनोंदणी संस्था रहिवाशांची नावनोंदणी करण्यासाठी तसेच रहिवाशांच्या डेटामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यासाठी नावनोंदणी केंद्रांची स्थापना करतील.

परिचालक/पर्यवेक्षक

नावनोंदणी संस्थेने नियुक्त केलेले परिचालक नावनोंदणी सॉफ्टवेअरचा वापर करून रहिवाशांची नावनोंदणी करण्यासाठी व अर्जामध्ये दिलेली जैवसांख्यिक माहिती घेण्यासाठी जबाबदार असतील. परिचालक सहाय्यक दस्तऐवजांची छापील/इलेक्ट्रॉनिक प्रत संकलित करतील किंवा प्राधिकरणाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतरित करतील.

परिचालक नावनोंदणी करत असताना पर्यवेक्षक केंद्राचे व्यवस्थापन करतील. पर्यवेक्षक प्रक्रियांचे पालन करणे, डेटा दर्जा, व अपवाद व्यवस्थापनासाठी जबाबदार असतील. पर्यवेक्षक नावनोंदणीही करू शकतात. परिचालक व पर्यवेक्षकांकडे आधार क्रमांक असला पाहिजे, व त्यांनी नावनोंदणीची कामे हाताळण्यापूर्वी प्रमाणित असले पाहिजे.

सामग्री विकास संस्था (सीडीए)

युआयडीएआय परिचालक/पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण साहित्य विकसित करण्यासाठी सामग्री विकास संस्था नियुक्त करते. सीडीए प्रशिक्षण साहित्य तयार करण्यासाठी दस्तऐवज व नवीन ग्राहक प्रसिद्धीपत्रकांचा वापर करतात, ज्यामध्ये परिचालक/पर्यवेक्षकांसाठी संगणक आधारित प्रशिक्षण साहित्याचा समावेश होतो. युआयडीएआयच्या संकेतस्थळावरून नावनोंदणी संस्थांसाठी व इतरांसाठी प्रत्येकवेळी प्रसिद्ध करण्यासाठी प्रशिक्षण साहित्य उपलब्ध आहे.

चाचणी व प्रमाणन संस्था (टीसीए)

युआयडीएआय नवीन परिचालक/पर्यवेक्षकांना प्रमाणित करण्यासाठी चाचणी व प्रमाणन संस्थांची नियुक्ती करते. ज्या परिचालकाचे/पर्यवेक्षकाचे प्रशिक्षण झाले आहे, व आधीच आधार देण्यात आला आहे, अशी व्यक्ती प्रमाणन चाचणीसाठी उपस्थित राहू शकते. चाचणी व प्रमाणन संस्था युआयडीएआयला, तसेच नावनोंदणी संस्थांना/पर्यवेक्षकांना प्रमाणनाचा निकाल देते.

जैवसांख्यिक उपकरण प्रमाणन

एसटीक्यूसी (प्रमाणीकरण चाचणी व दर्जा प्रमाणन) संचालनालय, हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाशी (डीईआयटीवाय) संलग्न कार्यालय असून, युआयडीएआयसाठी नावनोंदणी व प्रमाणीकरण साधन आवश्यकता निश्चित करणारी तसेच प्रमाणनाचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली केंद्रीय संस्था आहे. उपकरणांशी संबंधित सर्व विनिर्दिष्ट बाबी एसटीक्यूसीच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत व मोहाली तसेच नवी दिल्लीच्या एसटीक्यूसी प्रयोगशाळांमध्ये प्रमाणनाची कामे व्यापक प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत, ज्या जैवसांख्यिक उपकरणांची चाचणी घेण्यासाठी व प्रमाणनासाठी अद्ययावत साधनांनी सुसज्ज आहेत. अधिक माहितीसाठी, एसटीक्यूसीचे संकेतस्थळ पाहा.