आधार निर्मिती

आधार निर्मितीमध्ये दर्जा तपासणी, पॅकेट वैधांकन, जनसांख्यिक व जैवसांख्यिक नक्कल हटवणे इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो.केवळ पुढील परिस्थितीत आधार निर्मिती यशस्वी होऊ शकते:

  • नावनोंदणी डेटाचा दर्जा युआयडीएआयद्वारे विहित मानकांची पूर्तता करणारा असेल
  • नावनोंदणी पॅकेट सीआयडीआरमधील सर्व वैधांकन प्रक्रियांमध्ये उत्तीर्ण झाले
  • कोणतीही जनसांख्यिक/जैवसांख्यिक नक्कल सापडली नाही

वरीलपैकी एखादी अटही पूर्ण झाली नाही, तर आधार क्रमांक दिला जाणार नाही व नावनोंदणी फेटाळली जाईल.आधार निर्मितीची प्रक्रिया खाली सविस्तर देण्यात आली आहे.

रहिवासी व्यक्तिचा डेटा सीआयडीआरमध्ये अपलोड करणे

प्रत्येक रहिवाशाची नावनोंदणी सॉफ्टवेअर पॅकेटच्या स्वरुपात असते जिचे क्लायंटमध्येच नावनोंदणी पूर्ण झाल्यानंतर सांकेतिकरण केले जाते व युआयडीएआयने नावनोंदणी संस्थांना दिलेल्या अपलोड क्लायंटचा वापर करून केंद्रीय ओळख संग्रहात (सीआयडीआर) अपलोड केली जाते. अपलोड केलेल्या पॅकेटची नोंदणी ग्राहक सॉफ्टवेअरमध्ये राखून ठेवलेली असते ज्यामुळे सर्वरवर नक्कल पॅकेट अपलोड केलेजाऊ शकत नाही, यामुळे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ वाचतो तसेच पॅकेज फेटाळली जात नाहीत.सुरक्षित फाईल ट्रांसफर प्रोटोकॉल वापरुन सर्व डेटा सर्वरकडे हस्तांतरित केला जातो व त्यामुळे कोणत्याही संस्थेकडून डेटा गहाळ होण्याची काहीही शक्यता नसते.रहिवाशांकडून मिळालेल्या दस्तऐवजांचेही स्कॅनिंग केले जाते व सीआयडीआरमध्ये अपलोड केलेल्या नावनोंदणी पॅकेटचा ते भाग असतात.

सीआयडीआर योग्यता तपासणी: प्रत्येक नावनोंदणी पॅकेटची वैधता, सीआयडीआरच्या निर्मिती विभागात प्रक्रियेसाठी पाठविण्यापूर्वी सीआयडीआर डीएमझेडमध्ये स्वयंचलित प्रक्रिया वापरून त्याची सखोल तपासणी केली जाते- चेकसम, पॅकेट मेटा डेटा इत्यादी.

डेटा संग्रह: सीआयडीआरमध्ये, पॅकेटचे घटक वाचले जातात व डेटा सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी संग्रहित करण्यापूर्वी कोष्टकात साठवले जातात.संग्रहण यंत्रणेसाठी पुढील बाबी आवश्यक असतात:

  • सर्व मूळ पॅकेट (नावनोंदणी, सुधारणा इत्यादी) आहे त्यास्वरुपात, व “कायमस्वरुपी” संग्रहित करणे आवश्यक असते, ज्यामुळे ती कधीही उपलब्ध होऊ शकतात, व डेटा अजिबात गहाळ होत नाही.
  • संग्रहित पॅकेज सुरक्षित ठेवले जाते व मुख्य नावनोंदणी व प्रमाणीकरण यंत्रणेपासून वेगळे ठेवले जाते.
  • पुरालेख यंत्रणा योग्य उपलब्धता नियंत्रण व मान्यतेसह मागणीनुसार डेटा पुन्हा मिळविण्यास परवानगी देऊ शकते.
  • डेटा अजिबात गहाळ होणार नाही याची खात्री करण्यासाठी संग्रहित डेटाचा बॅकअप नियमितपणे घेतला जातो.

मुख्य प्रक्रिया वाहिनी

योग्यता तपासणी पूर्ण केल्यानंतर, नावनोंदणी पॅकेट मुख्य प्रक्रिया वाहिनीमध्ये पाठवले जाते. सर्वोच्च पातळीवर यामध्ये पुढील टप्प्यांचा समावेश होतो:

स्वयंचलित डेटा वैधांकन:सीआयडीआरमध्ये जनसांख्यिकीय डेटाच्या पुढील तपासण्या केल्या जातात:

  • नाव व पत्ता वैधांकन
  • भाषा वैधांकन
  • पिनकोड व प्रशासकीय प्रदेश
  • परिचालक, पर्यवेक्षक, प्रस्तावक वैधांकन
  • इतर डेटा व प्रक्रिया वैधांकन

जनसांख्यिक नक्कल हटवणे: यंत्रणेला अनावधानाने देण्यात आलेली किरकोळ नक्कल माहिती (फसवणूक नसलेली प्रकरणे ज्यामध्ये जनसांख्यिक माहिती देणाऱ्या सर्व चौकशीमध्ये सारखीच माहिती आहे) शोधण्यासाठी प्रामुख्याने जैवसांख्यिक नक्कल हटवण्याची प्रक्रिया वापरली जाते उदा., एखाद्या नागरिकाला काही दिवसात आधार क्रमांक मिळाला नसेल व त्याने नावनोंदणी केंद्रावर पुन्हा-नोंदणी करण्याचा निर्णय घेतला.त्याचा वापर ५ वर्षांखालील मुलांची नक्कल हटविण्यासाठीही केला जातो कारण युआयडीएआयच्या धोरणानुसार लहान मुलांचा जैवसांख्यिक डेटा घेतला जात नाही. जनसांख्यिक नक्कल हटविण्याचे उद्दिष्ट जैवसांख्यिक नक्कल हटविण्याची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी ही प्रकरणे वगळणे व किरकोळ नकलांची संख्या कमी करणे हे आहे.

हाताने दर्जा तपासणे: नावनोंदणी पॅकेटहाताने दर्जा तपासण्यासाठी पाठवली जातात, जेथे विविध दर्जा तपासणी परिचालक डेटातील जनसांख्यिकीय व छायाचित्राच्या दर्जाच्या समस्या तपासतात. यामध्ये रहिवाशांच्या छायाचित्राच्या योग्यता तपासण्यांचा समावेश होतो – ज्यामध्ये मानवी छायाचित्र आहे का, लिंग व वयातील गंभीर चुका, लिंग व छायाचित्र न जुळणे तसेच घेतलेल्या डेटातील समस्या (उदा. लिप्यंतरातील चुका) तपासल्या जातात.

जैवसांख्यिक नक्कल-हटविणे: एकदा पॅकेटने सर्व वैधांकन पूर्ण केल्यानंतर, व जनसांख्यिक तपासणी झाल्यानंतर, ते जैवसांख्यिक नक्कल-हटविण्यासाठी जैवसांख्यिकीय उप-यंत्रणेकडे पाठवले जाते.अचूकता व कामगिरीची पातळी सर्वोच्च असेल याची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या ३ विक्रेत्यांच्या स्वयंचलित जैवसांख्यिक ओळख यंत्रणा (एबीआयएस) वापरल्या जातात.विक्रेते सतत त्यांच्या यंत्रणाची कामगिरी सुधारत राहतील याची खात्री करण्यासाठी त्यांना अचूकता व कामगिरीच्या आधारे लाभांश दिला जातो.या विक्रेत्यांना रहिवाशांची नावे काढून टाकलेली जैवसांख्यिकी संदर्भ क्रमांकासह (सीआयडीआरमध्ये तयार केलेल्या) पाठवली जाते ज्यामध्ये रहिवाशांची ओळख जाहीर केली जात नाही. एबीआयएस यंत्रणा रहिवाशाची जैवसांख्यिकी त्यांच्या संग्रहात असलेल्या सर्व जैवसांख्यिकीशी जुळवून काही नक्कल आहे का हे पाहते.

मानवी निवाडा: एबीआयएस यंत्रणेने ओळखलेला सर्व नक्कल डेटा निवाड्यासाठी (अॅडज्युडिकेशन मोड्यूल) पाठवला जातो. या भागाचा हेतू एबीआयएस यंत्रणेमध्ये क्वचित चुकीची माहिती जुळण्याच्या शक्यतेमुळे रहिवासी व्यक्तिस फेटाळले जाणार नाही याची खात्री करणे हा आहे.

आधार देणे

रहिवासी व्यक्तिस विशेष ओळख देण्यासाठी आधार क्रमांक दिला जातो. रहिवाशाचा जनसांख्यिक डेटा आधार क्रमांकाशी जोडलेला असतो व ओळखीचा व पत्त्याचा दाखला म्हणून वापरता येतो. ही माहिती प्रमाणीकरण यंत्रणेलाही पाठवली जाते, म्हणजे रहिवाशाचे प्रमाणीकरण यशस्वीपणे केले जाऊ शकते.

आधार पत्र देणे

आधार तयार केल्यानंतर, डेटा छपाई भागीदाराला दिला जातो. छपाई भागीदार पत्र छापण्यासाठी (ज्यामध्ये मागोवा घ्यायच्या माहितीचाही समावेश होतो), व ते रसद पुरवठा भागीदारापर्यंत पोहोचविण्यास जबाबदार असतो. रसद पुरवठा भागीदारावर (भारतीय टपाल विभाग) रहिवाशाला प्रत्यक्ष पत्र देण्याची जबाबदारी असते.