Privacy Policy

संकेतस्थळ भेट डेटा

युआयडीएआय संकेतस्थळ आम्हाला तुमची वैयक्तिक ओळख समजेल अशी कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती (उदाहरणार्थ नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता), तुमच्याकडून आपोआप घेणार नाही.

हे संकेतस्थळ तुमची भेट नोंदवून ठेवते व पुढील माहितीची सांख्यिकीय हेतूने नोंद करते, उदाहरणार्थ इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ते, डोमेन नाव, सर्वरचा पत्ता; तुम्ही ज्या उच्चस्तरीय डोमेनवरुन (उदा. .gov, .com, .in, इत्यादी) इंटरनेट वापरता त्याचे नाव, ब्राउजरचा प्रकार, संचालन प्रणाली, भेटीची तारीख व वेळ, तुम्ही पाहिलेली पाने, डाउनलोड केलेले दस्तऐवज व आधीचा इंटरनेट पत्ता ज्यावरुन तुम्हाला थेट या पत्त्याशी जोडण्यात आले. आम्ही या संकेतस्थळाचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आल्याखेरीज हे पत्ते या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तिंच्या ओळखीशी जोडण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही वापरकर्ते किंवा ते काय ब्राउज करत आहेत हे ओळणार नाही, केवळ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने सेवा पुरवठादारांच्या नोंदींचे निरीक्षण करण्याचे आदेश दिल्यास याला अपवाद असेल.

युआयडीएआय संकेतस्थळाने तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली, तर तुम्हाला ही माहिती कोणत्या हेतूने गोळा केली जात आहे हे सांगितले जाईल. युआयडीएआय वैयक्तिक ओळख दाखवणारी युआयडीएआय संकेतस्थळावर स्वेच्छेने देण्यात आलेली कोणतीही माहिती कोणत्या तृतीय पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) विकत नाही किंवा देत नाही. या संकेतस्थळाला दिलेल्या कोणत्याही माहितीचे हरवणे, गैरवापर, अधिकृत उपलब्धता किंवा जाहीर करणे, बदल, किंवा नष्ट करणे यापासून संरक्षण केले जाईल.

कुकीज

कुकी हा सॉफ्टवेअर कोडचा एक भाग आहे जो तुम्ही एखाद्या संकेतस्थळावरील माहिती पाहता तेव्हा ते इंटरनेट संकेतस्थळ तुम्हाला पाठवते. हे संकेतस्थळ कुकीज वापरत नाही.

ई-मेल व्यवस्थापन

तुम्ही संदेश पाठवला जाण्याचा पर्याय निवडला तरच केवळ तुमचा ईमेल पत्ता नोंदवला जाईल. तुम्ही ज्या हेतूने तो दिला आहे केवळ त्यासाठीच तो वापरला जाईल व त्याचा पत्त्याच्या यादीत समावेश केला जाणार नाही. तुमचा ईमेल पत्ता इतर कोणत्याही हेतूने वापरला जाणार नाही, व तुमच्या संमतीशिवाय जाहीर केला जाणार नाही.

वैयक्तिक माहिती गोळा करणे

तुम्हाला इतर कोणतीही वैयक्तिक माहिती विचारण्यात आल्यास व तुम्ही ती देण्याची निवड केल्यास ती कशी वापरली जाईल हे तुम्हाला सांगितले जाईल. तुम्हाला या गोपनीयता निवेदनात उल्लेख करण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे वाटत असेल, किंवा या नियमांविषयी काहीही अभिप्राय असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा, या पानाद्वारे वेबमास्टरला सूचना द्या.

सूचना: या गोपनीयता निवेदनात वापरण्यात आलेला “वैयक्तिक माहिती” हा शब्द म्हणजे कोणतीही माहिती ज्यातून तुमची ओळख दिसून येते किंवा बरीचशी निश्चित करता येते.

पुरेशा सुरक्षा पद्धती

वैयक्तिक माहिती गोळा करण्यात आली तर ती सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी प्रशासकीय, तांत्रिक, संचालनात्मक व प्रत्यक्ष नियंत्रण यासारख्या पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.