ब्रँड आधार

माहिती, शिक्षण व संज्ञापन धोरण

युआयडीएआयच्या माहिती, शिक्षण व संज्ञापन (आयईसी) धोरणाचे उदिद्ष्ट सर्व भागीदारांना व रहिवाशांना आधारचे विविध वापर व लाभ याविषयी जागरुक करण्याचे आहे. निबंधक, युआयडीएआयसोबत आधारच्या उपयोगांविषयी माहिती वितरित करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतील, ज्यामुळे सरकारी व इतर योजनांचे लाभ इच्छित लाभार्थींपर्यंत पोहोचतील.
आधारचा संदेश सर्व रहिवाशांपर्यंत व्यापक स्वरुपात पोहोचण्यासाठी, तो पुढील संज्ञापन माध्यमांद्वारे दिला जाईल:

  • ध्वनिक्षेपण व प्रसारण: दूरदर्शन, रेडिओ, मुद्रित, इंटरनेट
  • माहिती: वृत्त व प्रकाशने
  • बाह्य: भित्तीपत्रके, माहितीपत्रके, भित्तीचित्रे, कापडी फलक, जाहिरात फलक
  • मनोरंजन: चित्रपट, खेळ, जाहिराती
  • परस्पर संवाद: ध्वनी, ध्वनीचित्रफित, दूरध्वनी
  • सहाय्यक पायाभूत सुविधा: निबंधक व नावनोंदणी संस्था पायाभूत सुविधा

आयईसी निधी पुरवठा

युआयडीएआय “आधार” ब्रँडशी थेट संबंधित सर्व साहित्याच्या निर्मिती व अंमलबजावणी टप्प्यात आवश्यक तेथे निधी पुरवेल. युआयडीएआय निबंधकांशी संबंधित “आधार” ब्रँडचा समावेश असलेल्या संपर्क साहित्यासाठीही निधी देईल. मात्र, निबंधकांना त्यांच्या विशिष्ट गरजांसंबधी माहिती प्रसारित करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीचा खर्च स्वतःच उचलावा लागेल.
युआयडीएआयच्या समर्पित पथकासह जाहिरात व जनसंपर्क यासारख्या संबंधित संस्था, निबंधकांसोबत आयईसी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी काम करतील.

जागरुकता व संपर्क योजना सल्लागार मंडळ (द अवेअरनेस अँड कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी अडव्हायजरी काउंसिल)

  • युआयडीएआयने युआयडी प्रकल्पाच्या यशासाठी जागरुकता व संपर्क योजनेचे महत्व ओळखून जागरुकता व संपर्क योजना सल्लागार मंडळ (एसीएसएसी) नियुक्त केले, त्यास युआयडीएआयचा हेतू साध्य करण्यासाठी जागरुकता व संपर्क योजनेची शिफारस करण्याचे अधिकार आहेत. या मंडळाची स्थापना तसेच त्याच्या अधिकाराविषयीचा आदेश येथे पाहता येईल: जागरुकता व संपर्क योजना सल्लागार मंडळ आदेश