संघटनात्मक संरचना
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (“प्राधिकरण/युआयडीएआय”) मुख्यालय (एचक्यू) नवी दिल्लीमध्ये आहे व देशभरात आठ प्रादेशिक कार्यालये (आरओ) आहेत. युआयडीएआयची दोन डेटा केंद्रे आहेत, एक हेब्बाळ (बेंगलुरू), कर्नाटक येथे व दुसरे माणेसर (गुरुग्राम), हरियाणा येथे आहे
मुख्यालय (एचक्यू)
प्राधिकरणामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या एका अर्ध-वेळ अध्यक्षांचा, दोन अर्ध-वेळ सदस्यांचा व एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे, जे प्राधिकरणाचे सदस्य-सचिव असतील.
श्री. जे. सत्यनारायण, आयएएस (निवृत्त) (१९७७, आंप्र संवर्ग) यांची प्राधिकरणाचे अर्ध-वेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नेटकोअर सोल्यूशन्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, श्री. राजेश जैन व पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. आनंद देशपांडे यांची युआयडीएआयचे अर्ध-वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यकार्यकारीअधिकारी (सीईओ), डॉ. अजयभूषणपांडे, आयएएस (१९८४, महाराष्ट्रसंवर्ग) हेप्राधिकरणाचे कायदेशीर प्रतिनिधी व प्रशासकीय प्रमुख आहेत.
मुख्यालय (एचक्यू)
मुख्यालयामध्ये (एचक्यू), सीईओंना सात उप महासंचालक (डीडीजी) मदत करतात, जे भारत सरकारचे सहाय्यक सचिव पातळीवरील अधिकारी असून, युआयडीएआयच्या विविध विभागांचे प्रभारी आहेत. डीडीजींना सहाय्यक महासंचलक (एडीजी), उप संचालक, विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी मदत करतात. मुख्यालयाची मंजूर करण्यात आलेली एकूण मनुष्यबळ संख्या १२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे, ज्यामध्ये लेखा व आयटी शाखांचाही समावेश होतो.
प्रादेशिक कार्यालये (आरओ)
युआयडीएआयच्या आठ प्रादेशिक कार्यालयांपैकी प्रत्येक कार्यालयाचे प्रमुख उप महासंचालक असतात (डीडीजी) व सहाय्यक रचनेमध्ये सहाय्यक महासंचालक, उप संचालक, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी, ज्येष्ठ लेखा अधिकारी, लेखापाल ववैयक्तिक कर्मचाऱ्यांचा समावेश असतो
प्रादेशिक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात कोणकोणत्या राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो याची यादी खाली देण्यात आली आहे:
प्रादेशिक कार्यालये (आरओ) |
आरओअंतर्गत येणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेश |
आरओ बंगलोर |
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, लक्षद्वीप |
आरओ चंडिगड |
जम्मू व काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व चंदिगडचा केंद्रशासित प्रदेश |
आरओ दिल्ली |
उत्तराखंड, मध्यप्रदेश, दिल्ली व राजस्थान |
आरओ गुवाहाटी |
आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा व सिक्कीम |
आरओ हैदराबाद |
आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओरिसा, छत्तिसगढ, अंदमान व निकोबार |
आरओ लखनौ |
उत्तर प्रदेश |
आरओ मुंबई |
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली, दमण व दीव |
आरओ रांची |
बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल |