युआयडीएआय यंत्रणा बद्दल

नावनोंदणी व सुधारणा यंत्रणा

नावनोंदणी यंत्रणेमध्ये निबंधक व नावनोंदणी संस्थांचा समावेश होतो. युआयडीएआयने व्यक्तिंची नावनोंदणी करण्यासाठी निबंधकांना अधिकार व मान्यता दिली आहे. निबंधक नावनोंदणी संस्थांची नियुक्ती करतात वत्यांची प्रमाणित संचालक/पर्यवेक्षक नियुक्त करुन नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान जनसांख्यिकीय व जैवसांख्यिकीय माहिती संकलित करण्याची जबाबदारी असते.

निबंधकांच्या सहकार्याने, नावनोंदणी संस्था नावनोंदणी केंद्रे स्थापन करतात जेथे निवासी आधारसाठी नावनोंदणी करु शकतात. एटीक्यूसी व युआयडीएआय नावनोंदणीसाठी लागणारेअनेक बोटांच्या ठशांचे स्कॅनर, डोळ्यांच्या बुबुळाचे स्कॅनर व कॅमेरे प्रमाणित करतात व हे सर्व युआयडीएआयने रचना केलेल्या प्रमाणभूत अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसला (एपीआय) जोडले जातात. अनेक निबंधक, अनेक नावनोंदणी संस्था, व अनेक तंत्रज्ञान पुरवठादारांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्यात एक निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रमाणीकरण यंत्रणा

युआयडीएआयने रहिवाशांच्या तात्काळ प्रमाणीकरणासाठी वेळोवेळी वाढवता येईल अशी यंत्रणा तयार केली आहे. आधार प्रमाणीकरण यंत्रणा दररोज लक्षवधी प्रमाणीकरणे हाताळण्यास सक्षम आहे, व ती भविष्यात गरजेनुसार वाढवता येऊ शकते. युआयडीएआयने अनेक प्रमाणीकरण सेवा संस्थांची (एएसए) नियुक्ती केली आहे, ज्या बिगर-सरकारी संस्थांची प्रमाणीकरण वापरकर्ता संस्था (एयूएस) म्हणून नियुक्ती करतात. युआयडीएआयने, एसटीक्यूसीच्या सहकार्याने जैवसांख्यिक साधनांसाठी तांत्रिक मानके निश्चित केली आहेत, व त्यापैकी काही प्रमाणित केली आहेत.

प्रमाणिकरण सेवा ऑनलाईन व तात्काळ दिली जात असल्याने, युआयडीएआयने दोन डेटा केंद्रांचीही स्थापना केली आहे जिथे प्रमाणीकरण व ई-केवायसीसारख्या इतर ऑनलाईन सेवा जास्तीत-जास्त उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी सक्रिय-सक्रिय पद्धतीने दिल्या जात आहेत. बँका व पेमेंट नेटवर्क संचालकांनी सूक्ष्म-एटीएममध्ये आधार प्रमाणीकरण बसवले आहे ज्यामुळे त्यांना देशात कुठेही शाखा-रहित बँकिंग वेळोवेळी वाढवता येईल अशाप्रकारे व आंतरसक्रिय पद्धतीने उपलब्ध करुन देता येते.