Biometric Devices- mr

बायोमेट्रीक उपकरणे म्हणजे बायोमेट्रीक डेटा हस्तगत करण्यासाठी उपयोगात आणलेली उपकरणे, बायोमेट्रीक डेटा म्हणजेच हाताच्या बोटांचे ठसे / बुबुळे / ह्या दोन्ही माहिती आधार क्रमांक धारकाकडून घेण्यात येतात. ही बायोमेट्रीक उपकरणे दोन वर्गात मोडतात, सुटी उपकरणे, एकीकृत उपकरणे.

सुटी उपकरणेः यांचा बायोमेट्रीक वर्गातील उपकरणांशी संदर्भ आहे (हाताच्या बोटांचे ठसे/ बुबुळे), ही उपकरणे पीसी/लॅपटॉप/मायक्रो एटीएम इ सारख्या होस्ट उपकरणांशी जोडणे आवश्यक असते.

एकीकृत उपकरणेः एकीकृत उपकरणांच्या आत एक संवेदक उपकरणाच्या पॅकेज मध्ये बसवलेला असतो, म्हणजेच फोन/ टॅबलेट इ.

बायोमेट्रीक उपकरणे खालीलप्रमाणे असू शकतातः

  • हाताने वापरता येणारी/पीओएस उपकरणे जसे की, मायक्रो एटीएम, अटेंडन्स उपकरणे
  • पीसी ला जोडलेली यूएसबी उपकरणे
  • बायोमेट्रीक संवेदक असलेला मोबाईल फोन
  • कियोस्क जसे की एटीएम, एमएनआरईजीए जॉब रिक्वेस्ट कियोस्क

विनंती करणाऱ्या संस्था त्यांच्या सेवा स्वाधीनतेच्या गरजा, सेवेचा प्रकार, व्यवहाराची घनता, अपेक्षित अचुकतेचा स्तर आणि जोखीमीचे घटक यांवर आधारित कोणत्याही योग्य प्रमाणीकरणाच्या पद्धती निवडू शकतात (बायोमेट्रीक पद्धतीत हाताच्या बोटांचे ठसे/बुबुळे). एकदा पद्धतीची हाताच्या बोटांचे ठसे/बुबुळे यांच्यासाठी संयुक्तपणे निवडल्यानंतर /बहुघटक प्रमाणीकरण ज्यात ओटीपी सोबत बायोमेट्रीक (हाताच्या बोटांचे ठसे/बुबुळे/दोन्ही) समावेश असल्यास प्रमाणित उपकरण पुरवठादाराच्या जाहीर केलेल्या यादीतून विनंती करणारी संस्था प्रमाणित बायोमेट्रीक उपकरण प्राप्त करू शकते.

सर्व प्रमाणीकरण ईको भागीदारांनी फक्त नोंदणीकृत उपकरणांचा वापर करणे यूआयडीएआय करिता आवश्यक आहे.

“नोंदणीकृत उपकरणे” म्हणजे आधार प्रणालीशी इनक्रिप्शन की व्यवस्थापन करण्यासाठी नोंदणी केलेली उपकरणे. आधार प्रमाणीकरण सर्व्हर अशा उपकरणांना ओळखून वैधता देऊ शकतो आणि प्रत्येक नोंदणीकृत उपकरणाच्या इनक्रिप्शन चाव्यांचे व्यवस्थापन करतो.

  • उपकरणाची ओळख – प्रत्येक भौतिक संवेदक उपकरणात एक युनिक आयडेंटीफायर असतो, जो उपकरणाचे प्रमाणीकरण, ट्रेसेबिलिटी, एनॅलॅटीक्स आणि बनावट व्यवस्थापन तपासून पाहतो.
  • साठवलेल्या बायोमेट्रीकचा वापर नष्ट करणे – प्रत्येक बायोमेट्रीक अभिलेख सुरक्षित परिक्षेत्रात प्रक्रिया करून इनक्रिप्टेड केला जातो, त्यातून अनइनक्रिप्टेड बायोमेट्रीक्सचे संवेदकापासून होस्ट मशीन कडे होणारे प्रसारण नष्ट करण्यात येते.

बायोमेट्रीक उपकरणाचे प्रमाणपत्र

प्रमाणीकरण करण्यासाठी वापरली जाणारी सर्व बायोमेट्रीक उपकरणे प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या बारकाव्यांनुसार प्रमाणित करावी लागतात.