दृष्टी आणि मिशन

दृष्टी

भारतातील रहिवाशांना अनन्य ओळख(युनिक आयडेंटिटी) देऊन कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी प्रमाणीकरण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देऊन सक्षम करणे.

मिशन

 • सब्सिडी, फायदे आणि सेवांचे सुशासन, कार्यक्षम, पारदर्शी आणि लक्ष्यित वितरण प्रदान करण्यासाठी, युनिक आयडेंटिटी नंबर देण्याच्या माध्यमातून भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी भारताच्या एकत्रित निधीतून खर्च केला जातो.
 • ज्या रहिवाशांनी विनंती करून नावनोंदणी प्रक्रियेत आपली जनसांख्यिकीय व बायोमेट्रीक माहिती सादर केली असेल, त्यांना आधार क्रमांक देण्यासाठी धोरण, कार्यपद्धती आणि प्रणाली विकसित करणे.
 • आधार धारकांना त्यांच्या डिजिटल ओळखीस अद्ययावत आणि प्रमाणीकरण करण्यासाठी धोरण, कार्यपद्धती आणि प्रमाणी विकसित करणे.
 • तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता, प्रमाणती आणि लवचिकता सुनिश्चित करणे.
 • यूआयडीएआय यांची दृष्टी व मूल्ये पुढे चालवण्यासाठी दीर्घकालिन टिकाऊ संघटनेची उभारणी करणे.
 • व्यक्तींच्या ओळखीची माहिती आणि प्रमाणीकरण अभिलेख सुरक्षित व गोपनीय ठेवण्याची सुनिश्चिती करणे.
 • सर्व व्यक्ती व संस्थांनी आधार अधिनियमाचे विधीवत व आत्मियतेने पालन करण्याची सुनिश्चिती करणे.
 • आधार अधिनियमाच्या तरतुदी चालविण्यासाठी आधार अधिनियमांचे सुसंगत नियम व नियमावली बनविणे.

मूलभूत मूल्ये

 • आमचा सुविधाजन सुशासन देण्यावर विश्वास आहे
 • आम्ही एकात्मतेचे मूल्य जाणतो
 • आम्ही सर्वसमावेशक राष्ट्र उभारणीसाठी कटीबद्ध आहोत
 • आम्ही परस्पर सहकार्याच्या दृष्टीकोनाचा पाठपूरावा करतो व आमच्या भागीदारांची कदर करतो
 • रहिवाशी आणि सेवा प्रदायकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू
 • आम्ही सातत्यपूर्ण शिक्षणावर आणि गुणवत्तापूर्ण सुधारणांवर नेहमी लक्ष्य केंद्रीत करतो
 • आम्ही नाविन्याने प्रेरित होतो व आमच्या भागीदारांना नाविन्ये शोधण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो.
 • आमचा पारदर्शक व मुक्त संघटनेवर विश्वास आहे.