आधार डेटा सुधारणा

Registered Mobile Number

Registered mobile number is essential to access Aadhaar Online Services

नावनोंदणी करतेवेळी किंवा नवीन आधार तपशील अद्यतन करतेवेळी घोषित केलेला आपला मोबाईल क्रमांक आपण सत्यापित करू शकता.

आधार मध्ये नावनोंदणी करतांना आपण आपला मोबाईल क्रमांक नोंदविला नसल्यास, आपणांस Permanent Enrolment Center ला भेट देऊन त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

आधारद्वारे सरकारी व बिगर-सरकारी सेवा, अनुदान लाभ, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, सामाजिक लाभ, बँकिंग सेवा, विमा सेवा, कर आकारणी सेवा, शिक्षण सेवा, रोजगार, आरोग्य देखभाल इत्यादी विविध सेवा दिल्या जात असल्यामुळे, सीआयडीआरमध्ये संग्रहित रहिवाशांचा आधार डेटा अचूक व अद्ययावत असेल याची खात्री करणे आवश्यक आहे.

जनसांख्यिकीय डेटा पुढील परिस्थितीत सुधारित करावा लागू शकतो:

  • आयुष्यातील घटनेतील बदल उदाहरणार्थ विवाह यामुळे नाव व पत्ता यासारख्या मूलभूत जनसांख्यिक तपशीलांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे पत्ता व मोबाईल क्रमांकामध्येही बदल होऊ शकतो. रहिवाशांना आयुष्यातील विवाह तसेच नातेवाईकाचा मृत्यू यासारख्या घटनांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या तपशीलांमध्ये बदल करायचा असू शकतो. त्याचशिवाय, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी बदलण्यासाठी रहिवाशांची व्यक्तिगत कारणेही असू शकतात.
  • विविध सेवा वितरण माध्यमामध्ये बदल झाल्याने रहिवासी माहिती देण्याविषयी संमती बदलण्याची व सीआयडीआरमध्ये मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याची विनंती करु शकतात.
  • नावनोंदणी प्रक्रियेमध्ये झालेली चूक ज्यामध्ये रहिवाशाचा जनसांख्यिक डेटा कदाचित चुकीचा नोंदवला गेला असेल. “जन्मतारीख/वय” व“लिंग” या चौकटींमधील बदल प्रामुख्याने नावनोंदणीतील चुकांमुळे अपेक्षित असतात.
  • रहिवासी भारतातून कुठेही नावनोंदणी करू शकतो, असेही होऊ शकते की “ए” मातृभाषा असलेल्या व्यक्तिची नावनोंदणी “बी” मातृभाषा असलेला परिचालकही करू शकतो व परिणामी रहिवाशाची नावनोंदणीची स्थानिक भाषा “बी” होते. नंतर, रहिवाशाला कदाचित नावनोंदणीची स्थानिक भाषा बदलून त्याला/तिला हवी असलेली भाषा करायची असू शकते. असे असल्यास, आधार पत्रावर छापलेली सर्व जनसांख्यिक माहिती नवीन स्थानिक भाषेत सुधारित करणे आवश्यक आहे.
  • युआयडीएआय नावनोंदणीच्या वेळी/सुधारणेच्या वेळी संकलित केलेले पीओआय, पीओए व इतर दस्तऐवज उपलब्ध असल्याची व त्यांच्या दर्जाची खात्री करू शकते व रहिवाशांना त्यांच्या जनसांख्यिक माहितीत सुधारणा करण्यासाठी व आवश्यक ते दस्तऐवज सादर करण्यासाठी अधिसूचित करण्याचा निर्णय घेऊ शकते.

जैवसांख्यिक सुधारणा करायची गरज पुढील परिस्थितीत निर्माण होऊ शकते:

  • नावनोंदणीच्या वेळी वय<५वर्षे होते– मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर त्याची पुन्हा-नावनोंदणी करणे व सर्व जैवसांख्यिक डेटा देणे आवश्यक आहे.या टप्प्यात मुलासाठी नक्कल-हटविण्याची प्रक्रिया केली जाईल. मूळ आधारक्रमांक कायम ठेवून ही विनंती नवीन नावनोंदणी विनंतीप्रमाणे मानली जाईल.
  • नावनोंदणीदरम्यान वय ५ व १५ वर्षांदरम्यान होते – रहिवासी १५ वर्षांचा झाल्यानंतर रहिवाशाने सर्व जैवसांख्यिक सुधारित माहिती सादर केली पाहिजे.
  • नावनोंदणीच्यावेळीवय>१५वर्षेअसल्यास – रहिवाशांनी त्यांची जैवसांख्यिक माहिती दर १० वर्षांनी सुधारित करावी अशी शिफारस आहे.
  • अपघातासारख्या घटना किंवा आजार ज्या जैवसांख्यिकीस अपवाद आहेत
  • आधार प्रमाणीकरण सेवा सार्वत्रिक झाल्यानंतर, प्रमाणीकरण अपयशी (चुकून फेटाळले- जेथे वैध आधार क्रमांक असलेला योग्य रहिवासी चुकून फेटाळला जाऊ शकतो) झाल्यावरही रहिवासी जैवसांख्यिक सुधारणेसाठी संपर्क करु शकतील, नावनोंदणीच्या वेळी जैवसांख्यिकीय माहिती चुकीच्या पद्धतीने घेतली किंवा जैवसांख्यिक माहितीचा दर्जा निकृष्ट असेल तर प्रमाणीकरण अपयशी होण्याची शक्यता असते. तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यामुळे, सीआयडीआरमध्ये चांगल्या दर्जाची जैवसांख्यिकी घेणे शक्य आहे.
  • युआयडीएआय नावनोंदणीच्या वेळी/सुधारणेच्या वेळी संकलित केलेले पीओआय, पीओए व इतर दस्तऐवज उपलब्ध असल्याची व त्यांच्या दर्जाची खात्री करू शकते व रहिवाशांना त्यांच्या जनसांख्यिक माहितीत सुधारणा करण्यासाठी व आवश्यक ते दस्तऐवज सादर करण्यासाठी अधिसूचित करण्याचा निर्णय घेऊ शकते.

आधारच्या पुढील तपशीलांमध्ये सुधारणा करता येते:

जनसांख्यिक माहिती

नाव, पत्ता, जन्मतारीख /वय, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, नात्याची स्थिती व माहिती देण्याविषयी संमती

जैवसांख्यिक माहिती

डोळ्याचे बुबुळ, बोटाचे ठसे व चेहऱ्याचे छायाचित्र

युआयडीएआय सुधारणा प्रक्रिया १८ पीओआय (ओळखीचा दाखला) व ३३ पीओए (पत्त्याचा दाखला) दस्तऐवज स्वीकारते. कृपया दस्तऐवजांची राष्ट्रीय पातळीवर वैध यादी पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

सुधारणेच्या पद्धती

१. ऑनलाईन पोर्टलद्वारे

स्व-सेवाऑनलाईन पद्धतीमध्ये रहिवासी थेट पोर्टलवर. जनसांख्यिकीत सुधारणेची विनंती करू शकतात.पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी आधार क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत. रहिवाशाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून त्याचे/तिचे प्रमाणीकरण केले जाते. सुधारणेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, रहिवाशाने स्वतः स्वाक्षरी केलेले सहाय्यक पीओआय/पीओए दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे, जे नंतरच्या टप्प्यात युआयडीएआयच्या सुधारणा बॅक-ऑफिसमधील प्रमाणक विनंती केलेल्या डेटाशी पडताळून पाहतील.ही सेवा वापरण्यासाठी रहिवासी व्यक्तिचा मोबाईल क्रमांक आधारकडे नोंदविलेला असला पाहिजे.

Using self-service Update Portal for online Aadhaar Data Update: Step 1 - Login to SSUP portal using Aadhaar and OTP, Step 2 - Select the fields to be updated, Step 3 - Fill the data in the selected fields, Step 4 - Submit the form & URN will be generated, Step 5 - Select the BPO for review of update, Step 6 - Attach original scanned copy of the support document, Step 7 - Using the URN check Aadhaar update status

२. मदतीद्वारे सुधारणेची पद्धत (नावनोंदणी केंद्राला भेट देऊन)

या पद्धतींमध्ये रहिवासी नावनोंदणी/सुधारणा केंद्रावर जाऊन परिचालकाच्या मदतीने सुधारणा विनंती सादर करू शकतात. अशा वेळी, परिचालक विनंती स्वीकारताना दस्तऐवजरुपी पुरावा संकलित करतो. सुधारणा विनंती सादर करताना पडताळक दस्तऐवजांची पडताळणीही करतो. युआयडीएआयने सध्या मदतीद्वारे सुधारणेच्या तीन पद्धती निश्चित केल्या आहेत:

a.अपडेट क्लायंट स्टँडर्ड

चौकटी: सर्व जैवसांख्यिक व जनसांख्यिक चौकटी तसेच स्थानिक भाषा सुधारित करता येते

ओळख प्रमाणीकरण: बॅक-एंडला जैवसांख्यिक तपासणी.

 

दस्तऐवज पडताळणी

  • ज्या चौकटींसाठी दस्तऐवजरुपी पुरावा आवश्यक आहे त्यासाठी केलेली पडताळणी.
  • युआयडीएआय/निबंधकांनी नियुक्त केलेल्यानावनोंदणी/सुधारणा केंद्रावर हजर असलेल्यापडताळकाद्वारे पडताळणी केली जाते.
  • पडताळणीची प्रक्रिया नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान पालन करण्यात आलेल्या डीडीएसव्हीपी समितीच्या शिफारसींनुसारच असली पाहिजे

 

अर्ज भरणे व पोचपावती

  • परिचालकाद्वारे अपडेट क्लायंटवर रहिवाशाने केलेल्या विनंतीनुसार करतो. स्पेलिंग, भाषेच्या समस्या, लिप्यंतर इत्यादी हाताळतो, परिचालक प्रत्येक सुधारणा विनंतीसमोर जैवसांख्यिक स्वाक्षरी करतो.

रहिवाशास मागोवा घेण्यायोग्य सुधारित विनंती क्रमांकासह (यूआरएन) एक पोचपावती मिळते.

Biometric Update Process: Step 1 - Filling Application Form, Step 2 - Manual Verification of proof, Step 3 - Entry of Data into client software by operator, Step 4 - Biometric Authentication by Resident, Step 5 - Operator & Supervisor's Confirmation, Step 6 - Acknowledgement of Receipt

b.अपडेट क्लायंट लाईट (युसीएल)

चौकटी: सर्व जनसांख्यिकीय चौकटी व छायाचित्रे तसेच स्थानिक भाषा सुधारित करता येतात.

निबंधक/एयूए: सर्व निबंधक व केयूए

ओळख प्रमाणीकरण: रहिवाशाचे जैवसांख्यिक प्रमाणीकरण.

दस्तऐवज पडताळणी

  • ज्यांच्यासाठी दस्तऐवजरुपी पुरावा आवश्यक आहे अशा चौकटींची पडताळणी.
  • युआयडीएआयने/निबंधकांनी नियुक्त केलेल्या नावनोंदणी/सुधारणा केंद्रात हजर असलेल्या पडताळकाद्वारे पडताळणी केली जाते.
  • पडताळणीसाठी ज्या प्रक्रियेचे पालन केले जाते त्या नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान डीडीएसव्हीपी समितीच्या शिफारसींनुसार असल्या पाहिजेत.

अर्ज भरणे व पोचपावती

  • परिचालक अपडेट क्लायंटवर रहिवाशाने विनंती केल्याप्रमाणे करतो. रहिवाशाला मागोवा घेता येईल अशा सुधारित विनंती क्रमांकासह (युआरएन) एक पोचपावती मिळते.परिचालक प्रत्येक जैवसांख्यिक सुधारणा विनंतीच्या समोर जैवसांख्यिकस्वाक्षरी करतो.

c.एयूए संपर्क बिंदुद्वारे सुधारणा

जे निवडक निबंधक एयूए होतील ते ही पद्धत वापरतील.युआयडीएआय सुधारणेसाठी अर्ज/एपीआय देऊ शकते.अशा सुधारणांसाठी निवडलेले निबंधक विशिष्ट जनसांख्यिक चौकटीतील माहिती संकलित करणे/तयार करणे/ बाळगणे आणि/किंवा व्यवस्थापित करण्यासाठी ओळखले जातील व अशा डेटाचे रक्षक मानले जातील.

चौकटी: जनसांख्यिकीय चौकटी

ओळख प्रमाणीकरण: एयूए उपकरणावर रहिवाशाच्या जैवसांख्यिक प्रमाणीकरणात; युआयडीएआय आवश्यक असल्यास इतर/अतिरिक्त प्रमाणीकरण घटक वापरण्याचा निर्णय घेऊ शकते. उदाहरणार्थ मोबाईल ओटीपी, या पद्धतीद्वारे सुधारित विनंती घेण्यासाठी.

परिचालक प्रत्येक सुधारणा विनंतीसमोर जैवसांख्यिक स्वाक्षरी देईल.म्हणूनच त्यांच्याकडे आधार असलाच पाहिजे.वापरलेल्या साधनासाठी/साधनांसाठी युआयडीएआयचे प्रमाणीकरण मानके लागू होतील.

दस्तऐवज प्रमाणीकरण: युआयडीएआय निबंधकांची पडताळणी प्रक्रिया व रहिवाशाच्या प्रमाणीकरणावर आधारित सुधारणा स्वीकारेल. लेखा परीक्षणासाठी, दस्तऐवजांच्या इलेक्ट्रॉनिक/स्कॅन केलेल्या प्रती कदाचित ऑनलाईन संकलित केल्या जातील. या दस्तऐवजांच्या प्रती प्रत्येक रहिवाशाच्या विनंतीसह घेता व स्वीकारता येतील, किंवा निबंधक त्या सुधारित विनंती क्रमांक, तारीख व वेळेनुसार उपलब्ध करून देऊ शकतील.

अर्ज भरणे व पोचपावती

  • हे काम निबंधकांच्या परिचालकाद्वारे (कर्मचारी/कंत्राटी) सूक्ष्म-एटीएमसारख्या जैवसांख्यिक प्रमाणीकरण वैशिष्ट्य असलेल्या उपकरणावर केले जाते.रहिवाशाला मागोवा घेण्यायोग्य सुधारित विनंती क्रमांकासह (युआरएन) पोचपावती मिळते. विनंतीच्या प्रकारानुसार पोचपावती ही छापील पावती असू शकते आणि/किंवा एसएमएस/ईमेलवर आधारित असू शकते. उदाहरणार्थ, मोबाईल क्रमांक सुधारित करण्यासाठी, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पोचपावतीचा एसएमएस पाठवला जाऊ शकतो. एपीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक तसेच छापील पावत्या तयार करायचे कार्य असेल. निबंधकांनी ठरवले असेल तर सुधारित विनंती घेतल्यानंतर छापील पावती देऊ शकतात.