संग्रहित आधार लोगो
स्पर्धा
आधार च्या लोगो करिता यूआयडीएआय ने फेब्रुवारी २०१० मध्ये देशभर लोगो स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांनतरच्या काही आठवड्यांत देशभरातून २००० पेक्षा जास्त प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
विजेत्या प्रवेशिकांचे निकष खालीलप्रमाणे लावण्यात आले होतेः
- लोगो मधून यूआयएडीआय ची उद्दिष्ट्ये व लक्ष्ये यांचे सार प्रवर्तित झाले पाहिजे
- लोगो मधून देशभरातील व्यक्तींना आधार ही परिवर्तनीय संधी असल्याचा संदेश गेला पाहिजे आणि ती गरीबांसाठी देखील सेवा आणि स्त्रोत प्रदान करणारी समान सेवा असली पाहिजे.
- लोगो लोकांना सहजतेने समजून आला पाहिजे व तो देशभरात संचारित झाला पाहिजे.
स्पर्धेसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोगो रचना प्राप्त झाल्या होत्या, त्यातील काही अभिनव आणि अत्यंत उच्च दर्जाच्या होत्या. या रचनांचे मूल्यांकन अवेअरनेस अँड कम्युनिकेशन स्ट्रॅटेडी एडव्हाईझरी कौन्सिल (ACSAC) ह्या यूआयडीएआय च्या सल्लागार संघटनेने केले, ज्यात नामांकित संवाद तज्ञांचा समावेश होता.
या कौन्सिलने दिलेल्या निकषांच्या आधारे अंतिम यादी निवडली. कौन्सिलचे एक सदस्य श्री. किरण खलप असे म्हणाले की, “आम्हाला अंतिम स्पर्धकांची व शेवटी विजेत्याची निवड करण्यासाठी निर्णय घेणे फार कठिण गेले.” “आम्ही निवडीसाठी जे निकष लावले होते ते आत्मवाद व प्रवृत्ती कमी राखणारे होते असे कृतज्ञतापूर्वक म्हणावे लागेल.”
अंतिम स्पर्धक खालीलप्रमाणे होतेः
- मायकल फॉली
- सॅफ्रन ब्रँड कन्सल्टंट्स
- सुधीर जॉन होरो
- जयंत जैन व महेंद्र कुमार
- अतुल एस. पांडे
येथे दाखवण्यात आलेली विजेती रचना श्री. अतुल एस. पांडे, पुणे यांनी सादर केली होती.
“यूआयडीएआय प्रकल्पात योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. या स्पर्धेमुळे यूआयडीएआय यांचे सर्वांना समान संधी देण्याचे वचन सदृढ होईल यावर माझा विश्वास आहे, कारण यातून आपणा सर्वाना रचना करण्याची व यात भाग घेण्याची संधी मिळाली, हा प्रकल्प खरोखरच एक परिवर्तनिय प्रकल्प होता.” श्री. पांडे.
Logo Launch
आधार लोगो चे अनावरण विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दि. २६ एप्रिल, २०१० रोजी भरवण्यात आलेल्या यूआयडीएआय इकोसिस्टिम प्रसंगी करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते श्री. अतुल एस. पांडे होते, त्यांना रू.१,००,००० रोख बक्षीस मिळाले. इतर चार अंतिम स्पर्धकांना प्रत्येकी रू.१०,००० एवढे बक्षीस देण्यात आले.