आधारची वैशिष्ट्ये व फायदे काय आहेत?

एक आधार: आधार हा विशेष क्रमांक आहे, व कुणाही रहिवाश्याला नक्कल क्रमांक मिळू शकत नाही, कारण तो त्यांच्या वैयक्तिक जैवसांख्यिकीशी संबंधित असतो; अशाप्रकारे खोट्या व बनावट ओळखी शोधता येतात ज्यामुळे सध्या सेवा वितरणात गळती होते. आधार-आधारित ओळख प्रमाणीकरणाद्वारे नक्कल व बनावट ओळख नष्ट केल्याने झालेल्या बचतीतून सरकार इतर पात्र रहिवाशांपर्यंत लाभ विस्तारित करू शकेल.
पोर्टबिलिटी: आधार हा विशेष क्रमांक आहे, लाभार्थीची ओळख पटवण्यासाठी एजेंसी आणि सेवा देशात कुठुनही युआयडीआयकडे संपर्क साधू शकतात.
सध्या कोणतेही ओळख दस्तऐवज नसलेल्यांचा समावेश: गरीब व उपेक्षित वर्गातील रहिवाशांपर्यंत लाभ पोहोचवण्यातील एक समस्या म्हणजे त्यांच्याकडे सरकारी लाभ मिळविण्यासाठी बऱ्याचदा ओळख दस्तऐवज नसतात; युआयडीएआयच्या डेटा पडताळणीसाठी "प्रस्तावक" यंत्रणाला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे अशा रहिवाशांची ओळख प्रस्थापित करणे शक्य होते.
इलेक्ट्रॉनिक लाभ हस्तांतर: युआयडी-समर्थ-बँक-खात्याच्या जाळ्यामुळे थेट रहिवाशांना लाभांचे वित्तप्रेषण करण्यासाठी एक सुरक्षित व स्वस्त पर्याय उपलब्ध होईल, सध्या हे लाभ वितरित करण्यासाठी अतिशय जास्त खर्च येतो; परिणामी सध्याच्या यंत्रणेतील त्रुटीही दूर होतील.
पात्र लाभार्थीलाच लाभ मिळावा याची खात्री करण्यासाठी आधार-आधारित प्रमाणीकरण: युआयडीएआय ज्या संस्थांना रहिवाशांची ओळख प्रमाणित करण्याची इच्छा आहे त्यांना ऑनलाईन प्रमाणीकरण सेवा देईल; या सेवेमुळे लाभ प्रत्यक्ष पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचतील याची खात्री केली जाईल. जास्त पारदर्शकतेद्वारे अधिक चांगल्या सेवा: अतिशय जबाबदार व पारदर्शक निरीक्षणामुळे लाभार्थी व संस्था या दोन्हींसाठीही विविध हक्कांची उपलब्धता व दर्जा लक्षणीयपणे वाढेल.
स्व-सेवेमुळे परिस्थिती रहिवाशांच्या नियंत्रणात राहते: आधारचा वापर प्रमाणीकरण यंत्रणा म्हणून करून, रहिवाशांना थेट त्यांच्या मोबाईलवरून, सेवा कक्षातून किंवा इतर माध्यमांद्वारे त्यांच्याहक्कांविषयी माहिती घेता येईल, सेवा मागविता येतील व त्यांच्या तक्रारींचे निवारण करता येईल.रहिवाशांच्या मोबाईलवर स्व-सेवेच्या संदर्भात, दोन-घटक प्रमाणीकरण वापरून सुरक्षेची खात्री केली जाते (म्हणजे रहिवाशांचा नोंदवलेला मोबाईल क्रमांक त्याच्याच ताब्यात आहे व रहिवाशाला आधार पिन माहिती आहे हे सिद्ध करून). ही मानके भारतीय रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग व पैसे देण्यासाठी मान्य केलेल्या मानकांनुसार आहेत.