माझी प्रमाणीकरणाची विनंती फेटाळण्यात आल्यास मला माझे हक्क (शिधा पत्रिका, नरेगा रोजगार इत्यादी) नाकारले जातील का?

युआयडीएआय व आधार प्रमाणीकरण घेणारे सेवा पुरवठादार ही वस्तुस्थिती जाणतात की आधार प्रमाणीकरण सेवेला काही तांत्रिक व जैवसांख्यिक मर्यादा आहेत उदाहरणार्थ बोटांचे ठसे स्पष्ट न उमटणे, नेटवर्क उपलब्धता इत्यादी. म्हणूनच सेवा पुरवठादारांकडे त्यांचे लाभार्थी/ग्राहक ओळखण्यासाठी/प्रमाणीत करण्यासाठी पर्यायी प्रक्रिया असली पाहिजे, ज्यामध्ये त्यांचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी अपवाद हाताळण्याच्या यंत्रणेचाही समावेश होतो, म्हणजे रहिवाशांना तांत्रिक किंवा जैवसांख्यिक मर्यादांमुळे त्यांचे हक्क नाकारले जाणार नाहीत.